Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चिमुकल्यांनी घेतली पाटलाची मुलाखत, "संवाद मनामनाचा"Interview with Patil

चिमुकल्यांनी घेतली पाटलाची मुलाखत, "संवाद मनामनाचा"

मूल (अमित राऊत)

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसूर्ला, केंद्र भेजगाव ,पंचायत समिती मुल अंतर्गत आज दिनांक 28 ला रोज शनिवारी शाळेतील नवोपक्रम विद्यार्थी कट्टा आयोजित "संवाद मनामनाचा" भाग दोन या कार्यक्रमात राजगड येथील समाजसेवक चंदू पाटील मारकवार यांना पाचारण करण्यात आले. Chandu Patil Marakwar

शाळेतील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी प्रदीप मोहूर्ले तसेच कुमारी वेदांती गणेश बुरबांदे वर्ग सातवीच्या या विद्यार्थिनींनी मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी मनमोकळ्या पद्धतीने दिली. सोबतच या मुलाखतीतून त्यांनी व्यसनमुक्ती तसेच राजगड हे गाव संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर प्रथम आणण्यासाठी जे काही अथक परिश्रम त्यांनी घेतले, त्या सर्व गोष्टींचा ऊहापोह आपल्या मुलाखतीतून त्यांनी केला. या कोवळ्या कळ्यामाजी लपले रवींद्र ,शिवाजी या पंक्तीप्रमाने अशा या नावीन्यपूर्ण उपक्रमातून नक्कीच एक आदर्श विद्यार्थी घडतील असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मुलाखत देताना वक्तव्य केले.

कार्यक्रमाच्या वेळी गावातील शारदा येनुरकर सरपंच ,करिश्मा वाढई उपसरपंच, विनोदभाऊ कावळे,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,सुभाष ठाकरे,पूनाजी ढोले, राखिताई खोब्रागडे,पूनमताई खांडरे,श्रीधर वाढई,महेश आंबटकर,मोहम्मद शेख,बजरंग गुरणुले,संजयभाऊ येणुरकर सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सुरेश टिकले, मुख्याध्यापक,विजय दुधे,प्रशांत कवासे,अविनाश श्रीगुरवार,स्मिता सायरे,शीतल धकाते,राजेंद्र चौधरी,नवनीत कंदालवार या सर्व शिक्षकवृंदानी तसेच शालेय मंत्रिमंडळ या सर्वांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments