Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल उपजिल्हा रूग्णालयातील कंत्राटी डॉक्टर, कर्मचारी तीन दिवसापासून संपावरच Doctors, staff on strike

मूल उपजिल्हा रूग्णालयातील कंत्राटी डॉक्टर, कर्मचारी तीन दिवसापासून संपावरच

मूल (अमित राऊत)
शासन सेवेत समायोजन करावे या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागील तीन दिवसापासून संप पुकारला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आरोग्य सेवा बजावतात.
सध्याच्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शासन सेवेत समायोजन करण्याची मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे, त्यासाठी विविध आंदोलने झाली, मात्र अद्यापही समायोजनाचा प्रश्न निकाली निघाला नाही.

त्यामुळे 25 ऑक्टोबर पासून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय बेमुदत संप पुकारला आहे. या संपात परिचारिका, परिचारक, अधिपरीचारिका, लॅब टेक्निशियन, औषध निर्माता, टीबी विभाग आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मणिपूर व राजस्थान राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments