Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे स्वच्छता अभियान, सभापती रत्नावार यांचा पुढाकार Cleanliness campaign

कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे स्वच्छता अभियान, सभापती रत्नावार यांचा पुढाकार

मूल (अमित राऊत)
गांधी जयंती निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती मूल मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आला. बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. स्वच्छतेचे महत्व महात्मा गांधींनी सांगितले आणि म्हणून संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यात येते. आपण आणि आपला परिसर स्वच्छ असला की मन प्रसन्न असते. स्वच्छता असल्याने आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होते, अशी माहिती यावेळी सभापती राकेश रत्नावर यांनी दिली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यात येते. मूल च्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात संपूर्ण परिसर स्वच्छ करुण कचरा मुक्त करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार संचालक संदीप कारमवार, घनश्याम येनुरकर, अमोल बच्चूवार, हसन वाढई, धनंजय चिंतावार, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक विवेक मुत्यलवार, सुरेश फुलझेले, संदिप मोहबे बाजार समितीचे सर्व कर्मचारी आदी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments