Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे कंत्राटीकरण व खाजगीकरण विरोधात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन

मूल येथे कंत्राटीकरण व खाजगीकरण विरोधात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन

मूल (अमित राऊत)
मूल येथे कंत्राटीकरण व खाजगी करणा विरोधात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 11 ऑक्टोंबर दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून गुजरी चोक ते तहसील कार्यालय मुल पर्यंत हा मोर्चा निघणार आहे.

सहा सप्टेंबर 2023 रोजी कंत्राटी तत्त्वावर नोकर भरती संदर्भात काढलेला शासन जीआर तात्काळ रद्द करावे, राज्यातील 62000 सरकारी शाळाचे होणारे खाजगीकरण पूर्णपणे रद्द करावे, वीस पटसंखेच्या आतील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावे, बेरोजगारांना पाच हजार रुपये प्रति महिना बेरोजगारी भत्ता देण्यात यावे, सर्व समुदायाची जातीनिहाय जनगणना तात्काळ करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यात यावे अशा पद्धतीच्या विविध मागण्यांना घेऊन मुल येथे 11 ऑक्टोबरला जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. या जन आक्रोश मोर्चाला मुल तालुक्यातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कंत्राटीकरण व खाजगीकरण विरोधी जन आक्रोश समितीने केले आहे.
Contract ikaran v khajgi karna viruddh Janakrosh morcha

Post a Comment

1 Comments

  1. ही खरी सामाजिक भान जागृत असण्याची निशाणी आहे. आपल्या अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई आपणच सर्वशक्तीनिशी लढायला हवी. आपले हक्क अधिकार संपवू पाहणारे कधी आपले नसतात!!

    ReplyDelete