Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळावा व रक्तदान शिबिर संपन्न

मूल उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळावा व रक्तदान शिबिर संपन्न

मूल (अमित राऊत )
मूल उपजिल्हा रूग्णालयात आयुष्यमान भव आरोग्य मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संध्याताई गुरुनुले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत आष्टणकर आमदार प्रतिनिधी तथा रुग्ण कल्याण समिती मुल, प्रमुख अतिथी डॉ. महादेव चिंचोले जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय चंद्रपूर, पवार साहेब नायब तहसीलदार, डॉ. समीर घेरे तालुका अधिकारी, डॉ.भोगावार न्युरोसजन उपजिल्हा रुग्णालय मुल, डॉ. भोगावार माॅडम स्त्री रोग तज्ञ, डॉ. देवेंद्र लाडे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय मुल आदी पाहूणे उपस्थित होते. 

यावेळी कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी व आरोग्य दर्जा उंचावण्यासाठी हि योजना महाराष्ट्र शासनाने उपक्रम राबविण्यात आली आहे, असे उद्घाटनप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत आष्टणकर यांनी आरोग्य शिबीराचे महत्त्व व तज्ञातुन रोगनिदान, उपचारांचे महत्त्व समजावून सांगितले, यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. चिंचोले जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय चंद्रपूर यांनी आयुष्यमान भव या शब्दाचा व योजनेचा मुख्य उद्देश रक्तदान, अवयव दान, नेत्रदान, हेच सर्व श्रेष्ठ दान आहे, तसेच ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत हि योजना राबविण्यात येत आहे असे मार्गदर्शनात सांगितले. 

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका गणवीर पर्यवेक्षिका, आभार प्रदर्शन ममता शेंडे, कार्यक्रमाला सहकार्य डॉ. उराडे, डॉ. वसीम, वैशाली वाघमारे पर्यवेक्षिका,रेखा ढाले , प्रीती तळोधीकर सर्व कर्मचारी आणि कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments