Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरात सरकारच्या विरोधात हजारो विद्यार्थ्यांचा जनआक्रोश

मूल शहरात सरकारच्या विरोधात हजारो विद्यार्थ्यांचा जनआक्रोश

मूल (अमित राऊत)

मूल येथील गुजरी चौक ते तहसिल कार्यालय पर्यंत कंत्राटीकरण व खाजगीकरण विरोधात मूल तालुकास्तरीय जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी कंत्राटी तत्त्वावर नौकरभरती संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाचा युवा वर्गावर होणारा दुर्गामी परिणाम लक्षात घेता तो निर्णय रद्द करण्यासाठी मुल तालुक्यातील विद्यार्थी, युवा, व पालकवर्गांनी जन आक्रोश मोर्चा काढला . त्याचबरोबर राज्यातील ६२००० शाळांचे दत्तक योजने अंतर्गत होणारे खाजगीकरण रद्द करण्यासाठी विद्यार्थी - पालकांचा आक्रोश दिसून आला . " नको आम्हाला तरकारी, पाहीजे शाळा सरकारी" या घोषणेसह IBPS व TCS या खाजगी कंपनीमार्फत सरकारने परीक्षा घेऊ नये त्याऐवजी जिल्हा लोकसेवा निवड समितीची व्यवस्था करावी असा सूर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यानी लावला होता . त्याचसोबत विद्यापिठाच्या सेमीस्टर परीक्षांची फी कमी करावी, बेरोजगारांना ५००० रुपये प्रति महिना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा . शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव दयावा. २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करून त्यांचे शहरी समूह शाळांत रूपांतर करू नये. शासनाच्या सर्व विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन तहसिलदार मूल यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री, मा. ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, मा. विरोधी पक्षनेता विधानसभा, पालकमंत्री, शिक्षक आमदार यांना कंत्राटीकरण व खाजगीकरण रद्द करण्याची मागणी केली .

या आक्रोश मोर्च्यासाठी कु. साक्षी गुरनुले, कु.काजल चौखुंडे, हर्षद सोमनकर, विनोद ठाकरे, संदीप मोरे, अंकुश गोहणे, आशिष निमगडे, वैभव लोणबले या विध्यार्थ्यांनी शासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला . त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे भूमीपुत्र ब्रिगेड, प्रा. दिलीप चौधरी संभाजी ब्रिगेड चंद्रपूर, प्रा. विजय लोणबले, हिरालाल भडके यांनी संबोधित केले . नंदकिशोर शेरकी यांनी आभार व्यक्त केले.

आक्रोश मोर्च्याच्या यशस्वीतेसाठी प्रब्रम्हानंद मडावी, अतुल तिवाडे,भास्कर रामटेके, लक्ष्मण सोयाम,सुनिल निमगडे, सुनिल शेरकी, दिलीप रामटेके, लक्ष्मण खोब्रागडे, प्रा. केवल कऱ्हाडे, प्रा. प्रभाकर धोटे, सुंदर मंगर, शुभम गावतुरे, राकेश मोहुर्ले, सुजित खोब्रागडे, विवेक मूत्यलवार, अमित राऊत,बादल मोहुर्ले, वसंत पोटे, बालस्वामी कुमरे, जितेंद्र लेनगुरे, केदार सोनुले, आतिश उराडे, कैलास कोसरे, अनिल नैताम, चंदन बिलवणे, सुरेश जिल्हेवार, शालीक गेडाम मार्कंडी चावरे, युवराज चावरे, भास्कर चौधरी, आकाश कोरेवार, सुरज नस्कुलवार, अविनाश लवंगे, पराग कोटरंगे, वैष्णवी नेवारे, किशन शेरकी यांनी योगदान दिले.

Post a Comment

0 Comments