Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, ताडाळा शेतातील घटना tiger attack

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, ताडाळा शेतातील घटना tiger attack

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील ताडाळा येथिल शेतात एका शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी सात वाजता चे दरम्यान घडली. सदर इसमाचे नाव सूर्यभान टिकले वय वर्ष 55 राहणार चिचाळा असे आहे.

सूर्यभान हा आपल्या शेतात पाहणी करिता सकाळी सात वाजता गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला करीत ठार केले.

सदर घटना गावात माहिती होताच घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. वनविभागाला ही माहिती देण्यात आली असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

वाघ मनुष्याला ठार केल्याच्या घटना वारंवार घडत असून वन्य प्राण्यांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.

Post a Comment

0 Comments