Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

गडीसुर्ला जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम "संवाद मनामनाचा"

गडीसुर्ला जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम "संवाद मनामनाचा"

मूल प्रतिनिधी
शासनाने दप्तराविना शाळा या उपक्रमाचे आयोजन प्रत्येक शाळेत काही वर्षापासून राबवित आहे आणि त्याच उपक्रमांतर्गत पंचायत समिती मुल मधील गडीसुर्ला येथील जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थी कट्टा  आयोजित संवाद मनामनाचा हा अनोखा कार्यक्रम  राबवित आहेत .या कार्यक्रमातून शाळेतील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी मोहूर्ले वर्ग सातवीची विद्यार्थिनी प्रत्येक महिन्याला विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या मान्यवरांची मुलाखतिद्वारे संवाद  साधणार आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सुरवातीला ऑटोग्राफ घेतला जातो. 

नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात लक्ष्मण खोब्रागडे सर तसेच वृंदा पगडपल्लीवार या दोन नवोदित कवींची मुलाखत तिने आपल्या सुंदर अशा शैलीमध्ये घेतली.सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टिकले  यांनी उपक्रमाबद्दल सांगताना म्हणाले की शाळेत अश्या विविध उपक्रमाचे आयोजन प्रत्येक शनीवार ला केल्या जाते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिले जातात.त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या हेतूने असे उपक्रम घेतले जातात.अशा विविध उपक्रमातून च विद्यार्थी हे घडत असतात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मत्रिमंडळ तसेच सुरेश टिकले मुख्याध्यापक, चौधरी सर, अविनाश श्रीगुरवार , विजय दुधे, शीतल धकाते, स्मिता सायरे तसेच नवनीत कंदालवार , प्रशांत कवासे या सर्व शिक्षक वृंदानी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments