Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शेतीच्या वादातून इसमाचा खून, बैलपोळयाच्या दिवशी डोनी येथील घटना, आरोपीस अटक

शेतीच्या वादातून इसमाचा खून,
बैलपोळयाच्या दिवशी डोनी येथील घटना,
आरोपीस अटक

मूल प्रतिनिधी
शेतीच्या जुन्या वादातून दुपटटयाने गळा आवळून एका इसमाचा खून झाल्याची घटना डोनी येथे बैलपोळयाच्या दिवशी रात्रो आठ वाजताच्या दरम्यान घडली.याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.ऐन पोळयाच्या दिवशी घटना घडल्याने डोनी येथे खळबळ माजली.मृतकाचे नाव अमृत बाजीराव अलाम वय 60 वर्षे असे  आहे.तर,आरोपीचे नाव विजयपाल गोंविदराव अलाम,वय 25 वर्षे असे आहे.
डोनी येथे अलाम कुटुंब राहतात.अमृत अलाम आणि विजयपाल अलाम या दोघांमध्ये दोन वर्षांपासून शेतीचा जुना वाद होता. हे दोघेही चुलत नातेवाईक आहेत. सदया शेतीमध्ये धानाचे पीक घेतले आहे. गुरूवारी बैलपोळयाच्या दिवशी समाजमंदिराजवळ विजयपालने अमृत सोबत शेतीचा जुना वाद उकरून काढला. वचपा काढण्याच्या उददेशाने रागाच्या भरात पांढ-या रंगाच्या दुपटयाने अमृतचे पाठीमागे दोन्ही हात बांधले. त्याच दुपटटयाने  गळा आवळून त्यास ठार मारले. ही घटना डोनी येथे वा-यासारखी पसरली.कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतक समाज मंदिराच्या पायरी जवळ टेकून पडलेले दिसले आणि दुपटयाने गळा आवळून खून केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी,मृतकाची पत्नी अन्नपूर्णाबाई अलाम हिने मूल पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.त्यावरून पोलिसांनी आरोपी विजयपाल गोंविदराव अलाम,रा.डोनी यांस अटक केली आहे.त्याच्यावर भांदविच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुमित परतेकी करीत आहे.
फोन लावण्यासाठी गेला आणि घरी परत आलाच नाही
घटनेच्या दिवशी अमृत बाजीराव अलाम हा सकाळी शेतीवर पीक पाहण्यासाठी गेला.घरी आल्यानंतर सायकाळी पोळा पाहण्यासाठी हनुमान मंदिराजवळ गेला.घरी सांयकाळी बैलजोडीची पुजा केली. त्यांनतर चुलत भावास फोन लावण्यासाठी फोन घेवून समाज मंदिरावजवळ गेला आणि आठ वाजता त्याचा खून झाल्याचीच बातमी घरी पोहचली.

Post a Comment

0 Comments