Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल बसस्थानकावर बसेस ची समस्या कायम, विद्यार्थी त्रस्त, शिवसेना करणार आंदोलन

मूल बसस्थानकावर बसेस ची समस्या कायम, विद्यार्थी त्रस्त, शिवसेना करणार आंदोलन

मूल प्रतिनिधी
मूल तालुक्यातील चिरोली, सुशी व गडीसूर्ला, जुनासुर्ला चांदापूर या ग्रामीण क्षेत्रातील अंदाजे 130 ते 150 विध्यार्थीनी मुल  येथे शिक्षण घेत असुन दररोज त्या महामंडळ च्या बसनी येणे जाणे करतात परंतु काही महिन्यापासून बस स्थानक महामंडळ यांच्या गलथान व ढसाड नियोजनामुळे विध्यार्थीनीना नाहक त्रास सहन करावा लागत असुन त्यांचा त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.विध्यार्थीनीना शालेय वेळेवर बस सोडल्या जात नाही त्यामुळे विध्यार्थीनी या नियोजीत वेळेत शाळेत पोहचु शकत नाही यातील बऱ्याचशा मुली या नवभारत कन्या विद्यालय मुल येथे शिक्षण घेत असुन त्यांची शालेय वेळ ही सकाळी 7.30 वाजता ते सुट्टी 11.45 वाजता होते परंतु वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने विध्यार्थीनी या चार ते पाच वाजेपर्यंत घरी पोहचतात व मुली घरी वेळेत न पोहचल्या मुळे पालक वर्ग चिंतेत असतात व महामंडळ बस चे चालक व वाहक कर्मचारी हे विध्यार्थीनीना अपमानास्पद वागणूक देत असुन या अडचणीमुळे विध्यार्थीनीच्या शैक्षणिक, मानसिक व आरोग्यावरही मोठा विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे अनेक विध्यार्थीनी या शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हि गंभीर बाब नव भारत कन्या विद्यालय मुल च्या प्राचार्य श्रीमती अल्काताई राजमलवार यांनी शिवसेना तालुका प्रमुख यांना संपर्क साधला असता शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख आकाश कावळे हे शहर प्रमुख विशाल नागुलवार पोंभुर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवर तालुका संघटक अफजल वाढई उप तालुका प्रमुख संतोष इपलवार यांचे सोबत शालेय शिक्षकवृद व विध्यार्थीनी घेऊन आगार प्रमुख यांना घेराव टाकत बस स्थानक व्यवस्थापक यांचे शी चर्चा करून मागणी पूर्ण केली परंतु बस कर्मचाऱ्यांकडून शालेय विध्यार्थीनीना योग्य वागणूक व वेळेनुसार जादा बस देण्याची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यन्त शिवसेना शांत बसणार नाही असा इशारा दिला चंद्रपूर आगार प्रमुख व गडचिरोली आगार प्रमुख यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या नंतर विध्यार्थीनीना कोणताही त्रास झाल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेने दिला....
यावेळी शिवसेना पदधिकारी अशोक गगपल्लीवर, दिवाकर झरकर, जयंत मंदाळे,वृषभ याटेवार,कालिदास बामणे,निचिल किरमे,गौरव पिल्लरवार, चिकू निकोडे, रमेश कुडमेथे व असंख्य शिवसैनिक विध्यार्थीनी व शिक्षक उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments