Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कर्मवीर महाविद्यालय मूल येथे 'पत्रकारिता व मराठी भाषा' या विषयावर मार्गदर्शन

कर्मवीर महाविद्यालय मूल येथे 'पत्रकारिता व मराठी भाषा' या विषयावर मार्गदर्शन

मूल प्रतिनिधी

शिक्षक प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल जि. चंद्रपूर येथे मराठी विभागाद्वारे प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांचे मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली पत्रकारिता व मराठी भाषा या विषयावर प्रमाणपत्र कोर्स चे आयोजन केले गेले. बुधवार ला त्याचा उद्घाटन सोहळा डॉ. आंबेडकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथिल प्रोफेसर तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. विजया गेडाम यांचा हस्ते पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून लोकसत्ताचे माजी वार्ताहार दिपक देशपांडे व माजी सैनीक संजय गेडाम विचारपीठावर विराजीत होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर विद्यापीठ गीताने वातावरण प्रसन्न झाले. प्रा. भूषण वैद्य सरांनी प्रमाणपत्र कोर्स का? आयोजित केला ते प्रास्ताविकेत मांडले उद्घाटक अतिथी डॉ. विजया गेडाम यांनी आपल्या मार्गदर्शनात उद्घाटन झाले हे घोषीत करुन पत्रकारिता व मराठी भाषेचा अतिशय जवळचा संबंध आहे. 

प्राचीन काळापासून मराठी भाषेची समृध्दी, व्यापकता सखोलता पत्रकारितेमधूनच सिध्द झालेली आहे. साहित्य क्षेत्रातील घडामोडीची अविट गोडी या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवीली जाते. त्यामुळे या कोर्समुळे विद्यार्थ्याचा नक्कीच फायदा होईल, या बाबतची सविस्तर माहिती दिली. दिपक देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनात पत्रकारिता म्हणजे बातम्या आणि माहिती गोळा करणे, मुल्यांकन तयार करणे व सादर करणे होय. स्मार्टफोनच्या जगात आज झालेले बदल या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती दिली. विद्याथ्र्यांनी मनस्थिती स्थिर करून स्वतः च्या मनावर कसा ताबा मिळवायचा याबाबतची माहिती संजय गेडाम यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी दिवसेदिवस नोकरी मिळणे कठीण झाले आहे. केवळ त्यासाठी आपण शिक्षण न घेता वेगवेगळी कौशल्य आत्मसात करुन स्वतःच्या विकासासोबत समाजसेवेचे काम केले पाहिजे. आपल्या मातृभाषेमधून पत्रकारिता हे कौशल्य शिकून विद्याथ्यांनी पत्रकारिता व्यवसायाकडे वळले पाहिजे, या हेतूने मराठी विभागाने हा प्रमाणपत्र कोर्स एक महिनाभर व्याख्यानाचे आयोजन करुन नियोजीत केला आहे. 

सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्याव्या अशी मौलोक माहिती दिली. दि. 13/ सप्टेबर ते 13 ऑक्टोंबर  या कालावधीत नियोजित अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र वितरण केले जाईल याबाबतची माहिती विद्याथ्र्यांना दिली गेली. कार्यक्रमाचे संचालन प्रा.श्वेता गुरवे मॅडमनी केले तर आभार डॉ. गणपत आगलावे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापकमंडळी व कर्मचान्यांनी परीश्रम घेतले.

Karamvir Mahavidhyalaya Mul, Principal, Lecture, Students
Program, Reporter, Marathi Language 

Post a Comment

0 Comments