Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यात वाघिणीचा मृत्यू, शेतात मृत्यूने खळबळ

मूल तालुक्यात वाघिणीचा मृत्यू, शेतात मृत्यूने खळबळ

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यांतील फीस्कुटी येथील पपलु वामन शेंडे हे जगदिश गावतुरे रा. चंद्रपूर यांची शेती करतात. आज मंगळवार ला सकाळी ७:३० चे दरम्यान महीला मजुर नींदन करण्यासाठी त्याचे शेतात गेले असता त्यांना तीथे एक वाघ मृतावस्थेत आढळला.

त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली. शेतमालकाने फीस्कुटी चे सरपंच मार्फत ही माहिती पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली. माहीती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता दोन ते अडीच वर्षाची वाघीण असल्याचे निदर्शनास आले.

नुकतेच रविवारी सायंकाळी मूल-सिंदेवाही मार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने वनविभागात खळबळ उडाली होती. अज्ञात वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. वनविभागाने त्या दिशेने तपास सुरू केला असतानाच आज फिस्कुटी शेतात अडीच वर्षाची वाघीण मृत अवस्थेत आढळली आहे. त्याचा तपासही वनविभाग करीत आहे.

प्रतिक्रिया,
वन्य प्राण्यांची वाढती संख्या आणि त्यांचा अधिवास याची कमतरता त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत, अशी प्रतिक्रिया प्राणीमित्र उमेशसिंह झिरे यांनी मूल Live शी बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments