Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्रशांतने वाचविले जखमी युवकाचे प्राण, संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहणारा समर्थ Prashant Samarth, a youth who maintains social responsibility

प्रशांतने वाचविले जखमी युवकांचे प्राण, संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहणारा समर्थ

मूल (अमित राऊत)


मूल शहरात रस्त्यावर पडलेले प्लास्टिकचे बॉटल उचलण्याचे काम करणारा भिकार अवस्थेत, मळक्या कपड्यात असणारा एक युवक एकदा चंद्रपूर रोडवर असलेल्या तहसील कार्यालयाच्या परिसरात पडला होता. त्याच्या डोक्याला मार लागलेला होता. डोक्यातून रक्त blood निघत होता. वरुन रिमझिम पाऊस बरसत होता. चंद्रपूर रोड वर मोठी वर्दळ Chandrapur Road तिथून ये जा करणारे बरेच नागरिक असतात मात्र त्या पडलेल्या प्लास्टिक बॉटल उचलणाऱ्या तरुणाकडे कुणीही लक्ष देत नव्हते. आणखी बराच वेळ तो तरुण तिथेच पडून असता तर त्याच्या जीवाला धोका होता.Danger to life

अशा परिस्थितीत मूल येथील नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ Prashant Samarth हे आपल्या पत्नीसह दुचाकीने Bike जात होते. त्यांची लक्ष त्या पडलेल्या युवकाकडे गेली. लगेच आपली गाडी थांबवत पडलेल्या त्या युवकाला रस्त्यावर उचलून बाजूला ठेवले. आणि त्याच्या डोक्याला मार लागला असल्याने लगेच गाडीची व्यवस्था करून त्याला मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आणि लगेच त्याचा उपचार झाला.Upazila Hospital Mul

विशेष म्हणजे हा सर्व प्रसंग अनेकांनी आपल्या उघड्या डोळ्याने बघत होते. मात्र धाडशी Brave attitude वृत्ती कुणीही केली नाही. सार्वजनिक रस्त्यावर पडलेल्या युवकाला बाजूला करत जखमी अवस्थेत असलेल्या युवकाचे प्राण वाचविण्याचे सत्कार्य प्रशांत समर्थ यांनी केले. आज तोच जखमी अवस्थेत असलेला युवक चांगला होऊन पुन्हा आपले काम नित्यनेमाने करताना दिसतो. एक प्रकारे नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे काम त्या युवकांकडून घडत आहे. कुणाच्या घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी आग लागलेली असो, मूल शहरात कुठेही अपघात घडलेला असो, कुणाला मदत लागली असेल, शासकीय कार्यालयातील काम असेल, कुठल्याही कामाच्या मदतीला प्रशांत समर्थ त्याच्या पाठीशी उभा राहतो.A helper in difficult times

एका वार्डापूर्तीच मर्यादित नगरसेवक म्हणुन न राहता मुल शहरात कुठलाही प्रसंग घडो त्या ठिकाणी ठामपणे एक माणुसकी दर्शवत काम करणे त्याच्या स्वभावातून दिसते. शहरातील विविध वार्डातील नगरपरिषद अंतर्गत असलेल्या समस्या अनेकदा प्रशांत समर्थ यांना नागरिक सांगताना दिसतात. कुठल्याही प्रसंगी सामाजिक भान ठेवून काम करत असताना प्रशांत समर्थ यांची पत्नी एकता समर्थ साथ देत असते हे विशेष!

Post a Comment

0 Comments