Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

महसूल सप्ताह अंतर्गत युवा व लोकशाही विषयावर मुक्त परिसंवादाचे आयोजन Organized Open Seminar on Youth and Democracy under Revenue Week

महसूल सप्ताह अंतर्गत युवा व लोकशाही विषयावर मुक्त परिसंवादाचे आयोजन

मूल (अमित राऊत)


कर्मवीर महाविद्यालय मूल च्या राज्यशास्त्र विभाग आणि तहसील कार्यालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताह अंतर्गत 'युवा आणि लोकशाही'या विषयावर मुक्त परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला अध्यक्ष अश्विनी मांजे उपजिल्हाधिकारी चंद्रपूर,प्रमुख वक्ते सहायक प्रा.राहुल तायडे कृषी महाविद्यालय वरोरा,प्रमुख उपस्थिती डॉ.विष्णुपंत टेकाळे मुख्य अधिष्ठाता कृषी महाविद्यालय मूल, डॉ.रविंद्र होळी तहसीलदार मूल,नायब तहसीलदार यशवंत पवार तसेच कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता वाळके उपस्थित होते.प्रमुख वक्ते श्री तायडे यांनी आपल्या व्याख्यानात लोकशाही ची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करून भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित केले.भारत हा युवांचा देश असून भारतीय लोकशाही ची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे.युवकांनी आपल्या अधिकाराबाबत जागरूक असायला हवे.

डॉ.अनिता वाळके यांनी भारतीय लोकशाहीचा पाया मजबूत करायचा असेल  समता बंधुता आणि न्याय याची पायाभरणी होणे आवश्यक आहे तसेच मतदान आपले आद्य कर्त्यव्य समजून युवकांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे.तहसीलदार रवींद्र होळी यांनी युवकांना आव्हान केले की आपले अमूल्य मत योग्य उमेदवाराला देऊन आपला मतदानाचा हक्क आणि संविधानाप्रति आपली जबाबदारी पार पाडावी. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती अश्विनी मांजे यांनी निवडणूक प्रक्रिया कशी पारदर्शक असते उदाहरण देऊन स्पष्ट केले.युवकांनी मतदान करताना EVM मशीन बद्दल मनात कोणताही संभ्रम न ठेवता योग्य उमेदवारांना निवडून द्यावे असे आव्हान केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार यशवंत पवार यांनी तर कार्यक्रमाचे संचालन श्री.कुमरे नायब तहसिलदार आणि आभार श्री.ठाकरे नायब तहसीलदार यांनी मानले.कार्यक्रमाला प्रा.प्रवीण उपरे,प्रा.सिकंदर लेनगुरे,प्रा.पडोळे,प्रा.निखिल दहिवले तसेच मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments