Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पिपरी दिक्षित येथिल अवैध दारू बंद करा अन्यथा आंदोलन करु - गावकऱ्यांचा इशारा Illegal liquor ban movement

पिपरी दिक्षित येथिल अवैध दारू बंद करा अन्यथा आंदोलन करु - गावकऱ्यांचा इशारा

गावकरी धडकले पोलीस स्टेशन वर

मूल (अमित राऊत)
मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित येथील गावकरी मुल पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात अवैध दारू विक्रीच्या विरोधात तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना भेटुन निवेदन देण्यात आले.

पिपरी दीक्षित येथे देशी व विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात उघडपणे विक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील अल्पवयीन मुले दारू पिण्याच्या आहारी जात आहे. महिलांची संसार उध्वस्त होण्याच्या तक्रारी वारंवार वाढत आहेत. गावात उघडपणे दारू विक्री असल्याने शालेय विद्यार्थ्यांना व गावातील महिलांना मानसिक आणि कौटुंबिक त्रास सहन करावा लागत आहे.

अति दारू पिणाऱ्यांकडून मुख्य चौकात सतत भांडणे होतात. सदर बाब अतिशय गंभीर तसेच संवेदनशील असल्याने ग्रामपंचायत पिपरी दीक्षित कडून संपूर्ण अवैध दारूबंदीचा निर्णय घेतले आहे.

यासोबतच पिपरी दीक्षित गावालगत सुद्धा दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू असल्याने त्याचा सुद्धा वाईट परिणाम अनेक कुटुंबावर होत आहे. यामध्ये काही पोलीस कर्मचारी सुद्धा अवैध दारू विक्रेत्यांकडून हप्ता वसुली करून त्यांना करण्यास प्रोत्साहन देतात. असा आरोप गावकऱ्यांनी केला. या समस्यांचा विचार करून लवकरात लवकर अवैद्य दारूबंदीसाठी योग्य पाऊल उचलावे व अवैध दारूबंदीवर आळा घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments