Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल च्या वात्सल्य बचत गटाची गगन भरारी, बचतीतून करणार विदेशवारी Gagan Bharari of Mul's Vatsalya self-help group

मूल च्या वात्सल्य बचत गटाची गगन भरारी, बचतीतून करणार विदेशवारी

मूल (अमित राऊत)
लोकांमध्ये बचत करण्याची प्रवृत्ती विकसित करणे, गरीब नागरिकांना स्वयंरोजगार, प्रशिक्षण आणि कर्जपुरवठा, गरिबी निर्मूलन, महिलांची सामाजिक स्थिती सुधारणे असे विविध उदिष्ट बचत गटाचे आहेत. याच सामाजिक हेतुने मूल शहरात योग पतंजली च्या माध्यमातुन वात्सल्य बचत गटाची निर्मिती झाली. बचत गट आज गगन भरारी घेत असल्याचे अनुभव आणि योग पतंजली शाखा मूल विषयी माहिती पदाधिकाऱ्यांनी प्रेस क्लब मूल च्या पत्रकारांसोबत पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी अध्यक्ष प्रभाकर भोयर उपाध्यक्ष तथा योग प्रशिक्षक अनिल गांगरे दिवार सचिव दिलीप पोकळे, किशोर भडके, रवी कोल्हटवार, प्रा.रत्नमाला भोयर आदी उपस्थित होते.

योग पतंजली समिती मुलीची स्थापना 2012 13 या आर्थिक वर्षात करण्यात आली. त्या माध्यमातून रोज सकाळी पाच ते सात या वेळात योगा प्राणायाम ध्यान आणि प्रार्थना करण्यात येते. यामध्ये लोक जुडत गेले. लोक जोडून ठेवण्यासाठी बचत गटाची स्थापना करण्यात आली. यामध्ये 281 सदस्यांनी 200 रुपये प्रमाणे शुल्क भरून गटाचे सभासद झाले. सदस्यांमध्ये संवाद, आत्मीयता आणि सलोखा वाढण्याकरिता दर महिन्यात सामूहिक भोजनाचा कार्यक्रम करण्यात येते. यामध्ये सभासदांचा प्रतिसाद वाढत गेला. समितीच्या सदस्यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे स्वामी रामदेव बाबा यांना मूल नगरीत आमंत्रित करून महाशिबिर घेण्याची इच्छा प्रकट केली. श्री. मुनगंटीवार यांनी समितीच्या आणि नागरिकांच्या विनंतीनुसार 2018 ला मूल शहरात कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर महाशिबिर आयोजित करून यशस्वी केला. यामध्ये योग पतंजली समिती पदाधिकाऱ्यांना यश आले. 

प्रत्यक्ष रामदेव बाबा यांचे मूलमध्ये दर्शन झाल्याने योगाकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यानंतर योग पतंजली समिती मोर्चा वतीने ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे योगा भवनाकरिता मागणी केली. तत्कालीन नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी इतर नगरसेवक यांच्या सहकार्यातून नगर परिषदेच्या माध्यमातून एक ठराव मंजूर केला. श्री.मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून मागणी मंजूर करण्यात आली. 88 लक्ष रुपये खर्च करून मूल शहरात योगा भवन बांधण्यात आला. 

या सोबतच वात्सल्य बचत गटातील 110 व्यक्तींना नागपूर वरून विमानाने दिल्लीला व तिथून काश्मीर वैष्णोदेवी असा आरोग्यदायी सहलीचा प्रवास करण्यात आला. विशेष म्हणजे यात गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता बचत गटात सर्व स्तरातील महिला पुरुष यांचा समावेश आहे. त्यामुळे मोलकरीण व मोलमजुरी करणाऱ्यांनी सुद्धा विमानाचा प्रवास आणि त्याचा अनुभव घ्यायला मिळाला. अशा सहलीचे आयोजन नियमित केल्या जाते. काहींची आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी समानता मे एकता यातून दिसते. एवढेच नव्हे तर त्यानंतर विदेशवारी घडवून आणण्यासाठी वारी गट सुद्धा सुरु करण्यात आला. यामध्ये 40 सभासद एकत्र जोडले गेले आणि सर्वानुमते विदेशवारी करण्याचा मानस आहे.

योग पतंजली समिती मूलतर्फे 21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त शहरात प्रभात फेरी काढण्यात येते त्यानिमित्ताने कार्यक्रम घेण्यात येते. दरवर्षी रक्तदान शिबिर घेतल्या जाते. विविध रोगांवर उपचाराकरिता नुकताच योगा भवनात सात दिवसाचा आरोग्य शिबिर ठेवण्यात आला आहे. विना औषधाने या रोगांवर उपचार केल्या जात आहे. यामध्ये ॲक्युप्रेशर, सुजोक, वाईब्रेशन, नॅचरल थेरपी चिकित्सा असे विविध पद्धतीने उपचार यामध्ये केला जात आहे. योग पतंजली समिती मुल आणि त्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बचत गटाची त्यांच्या कार्याची व्याप्ती जनतेसमोर ठेवण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करून पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती विषद केली.

Post a Comment

0 Comments