Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन उत्साहात, लोकमत सखी मंच व जिजाऊ ब्रिगेड यांचा उपक्रम

रक्षाबंधन’ हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो. भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच राख – सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे.


लोकमत सखी मंच व जिजाऊ ब्रिगेड तर्फे मुल पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. रत्नमाला भोयर यांनी राखीचे महत्व समजावून सांगितले. पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी महिलांना चोरांपासून सतर्क रहावे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोड यांनी चोरांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी छोनकर यांनी केले. यावेळी लोकमत सखी मंच च्या तालुका संयोजीका जयश्री चन्नुरवार, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा संजीवनी वाघरे, स्त्रीशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष कुमुदिनी भोयर, कल्पना नरुले, विद्या बोबाटे, कल्पना मेश्राम, मनीषा भोयर, भारती हरमवार, सुजाता बरडे, श्वेता शेरकी, मिनाक्षी छोनकर, टिना ठाकरे, मैथीली हेडाऊ, मैदमवार ताई, वंदना वाकडे, सुनीता भुरसे, नीता जोशी. मंगला गेडाम, पायल सोनुलवार, सारीका वासेकर, श्वेता शेरकी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments