Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

स्वतंत्र हिंद देश माझा, मिळविला पारतंत्र्यातूनी

स्वतंत्र हिंद देश माझा, मिळविला पारतंत्र्यातूनी


स्वतंत्र हिंद देश माझा
मिळविला पारतंत्र्यातूनी..
चढवून क्रांतिचा झेंडा
पराक्रम,बलिदानाची झुंज देऊनी...

देशाचा मी संरक्षक आहे
मीच साम्राज्याचा खचवितो पाया
मानवता विसरुन चाललो
मलीन झाली माझी काया...

लाच,भष्टाचार,बेकारीच्या
जागोजागी डिग्र्या घेत आहे
राजकारणाच्या जहरी दलदलीत
सामान्य माणूस फसत आहे...

स्त्रीच्या अब्रुचे धिंडवडे काढून
निर्भय होत चालला माझा देश
प्रगती आधुनिकतेची झाली
मात्र चरीत्राची सुकली वेल...

स्वातंत्र्याचा रंग आता
भारतात फीका पडत आहे
अन्याय, अत्याचार सहन करुन
जनता बळी पडत आहे...

भविष्याचं काय स्वप्न बघू
हेच मला कळत नाही
स्वतंत्र आहे माझ्या देशात मी
फक्त अधिकार कसलेच नाही...

© माधुरी लेनगुरे
मूल जि. चंद्रपूर

Post a Comment

0 Comments