Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार, शाळा व्यवस्थापन समितीचा आरोप

मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार, शाळा व्यवस्थापन समितीचा आरोप

मूल प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासुरला येथील मुख्याध्यापक मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप करून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासुर्ला येथील शाळा व्यवस्थापन समितीने संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मूल यांना चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.

जि.प.उ.प्रा.शाळा जुनासुर्ला येथील मुख्याध्यापक बलराम कचरू वाळके कार्यरत असून येथील शाळा व्यवस्थापन समितीला मासीक सभा अथवा कोणतीही विचारपूस न करता समीतीला डावलून स्वतः विद्यार्थ्यांचे पोषक आहार स्वताच्या मर्जीने घेतल्याचा आरोप केला आहे तसेच शाळेच्या इमारतीमध्ये दि.२८/०६/२०२३ला घेण्यात आलेल्या लग्न समारंभ विश्वासात न घेता स्वतच्या मर्जीने घेतल्याचा आरोप केला आहे  शाळा व्यवस्थापन समितीला विश्ववात न घेता स्वतःच निर्णय घेत असतो आणि शाळा व्यवस्थापन समिती विचारणा केली असता तुमच्याने जे बनते ते करा माझी तक्रार करा, माझ्या विरूद्ध आंदोलन करा, जिल्हाअधिकारी साहेबांकडे जा नाही तर मंत्र्यांकडे जा कुणाला घाबरत नाही व कोणीही काही वाकड करू शकत नाही अशा उद्धट भाषेचा वापर करून त्यांना शिवीगाळ करतो हा प्रकार शाळा व्यवस्थापन समितीला काळीमा फासला आहे.

मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार व हेकेखोर स्वभावामुळे शाळा व्यवस्थापन समितीला कोणतीही किंमत राहिलेली नसून फक्त कागदोपत्री समिती अस्तित्वात असल्याचे दिसून येते. शाळा व्यवस्थापन समिती शासनाच्या धोरणानुसार स्थापन झालेली असून शासनाचा या मागे उच्च हेतू होता. पालक वर्ग, शाळा प्रशासन व शाळा समितीमध्ये समन्वय राहावा योग्य निर्णय घेतले जावे शाळेचा प्रशासन योग्य रहावे हा उद्देश असल्याने शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते श्री वाळके यांनी शासनाच्या धोरणाला काळीमा फासला आहे . मुख्याध्यापक यांनी मर्जीने घेतलेल्या निर्णयांची चौकशी करून मुख्याध्यापक याचेवर योग्य ती कारवाई करावी असे शाळा व्यवस्थापन समिती जुनासुर्ला यांना न्याय द्यावे अशी विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments