Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अबब... पोलिसांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे, बांधकाम विभागाचे काम पोलिसांनी केले

अबब... पोलिसांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे, बांधकाम विभागाचे काम पोलिसांनी केले

मूल (अमित राऊत )

पावसामुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून, अपघाताचा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येथे परिणामी ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. या डोकेदुखीतून वाहनचालकांची सुटका व्हावी तसेच अपघात बचाव करण्या करिता या हेतूने मुल चंद्रपुर रस्त्यावर अंधारी नदी जवळ वळणावर पडलेले खड्डे हे अपघातास आमंत्रण देत होते हि गंभीर बाब मुल पोलिसांच्या लक्षात येताच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा पुढाकाराने आज बुधवारी खड्डे बुजविण्यात आले.

या रस्त्याची मालकी ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडे आहे. हा रस्ता नियमानुसार महामार्ग प्राधिकरणाकडून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, त्याा विलंब लागत असल्याने तसेच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केला असला तरी, या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पडलेले खड्डे, रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत आणि रस्त्यावरील चिखल यांमुळे मोठ्य़ा प्रमाणात अपघात होत आहेत तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. चंद्रपुर जाणाऱ्या रस्त्याची महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदाराकडून डागडुजी करण्यात येत होती परंतू त्यांचे पुर्णतः या बाबी कडे दूर्लक्ष होत आहे ही बाब मुल पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांचा निर्दशनास आली जनसेवा हीच खरी सेवा समजुन आपल्या कर्मचार्यांना सोबत घेऊन मुल पासुन 20 कि.मी वरचे अपघातास आमंत्रण देणारे खड्डे मुल पोलिसांनी भुजविले.

Post a Comment

0 Comments