Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कृषी उत्पन्न बाजार समितीत ध्वजारोहन व वृक्षारोपण

कृषी उत्पन्न बाजार समितीत ध्वजारोहन व वृक्षारोपण

मूल प्रतिनिधी
15 ऑगष्ट,2023 रोज मंगळवार ला सकाळी 8.10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती,मूल चा मान.राकेश या.रत्नावार,सभापती यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यांत आले. स्वातंत्र दिनाच्या ध्वजारोहणाकरिता स्वतंत्रदिनाच्या ध्वजारोहणा करिता समितीचे उपासभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक घनश्याम म.येनुरकर,संदिप अ.कारमवार,किशोर घडसे,लहू कडस्कर,सुमीत आरेकर, शालीक दहिवले, अमोल बच्चुवार,सौ.चंदा कामडी, रमेश बरडे, समितीचे प्रभारी सचिव अजय गंटावार, माजी संचालक धनजंय चिंतावार,मारोती चिताडे,तसेच, सुभाष प्राथमीक शाळा व जिल्हा परिषद प्राथमीक शाळेचे विद्यार्थी व विदयार्थीनी व शिक्षक वृंद,व्यापारी,अडत्ये,हमाल,मापारी  मदतनिस व समितीचे सर्व कर्मचारी वृंद आणि समितीचे बाजूचे वार्डातील नागरीक मोठया संख्येने उपस्थितीत होते. 
स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन समितीचे सभापती यांनी उपस्थितीत सर्व नागरीकांना व मूल जनतेला स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देवून बाजार समिती हि शेतकऱ्यांची बाजार समिती असून शेतकऱ्यांनी आपला उत्पादीत शेतीमाल बाजार समितीच्या आवारात विक्री करून समितीला सहकार्य करावे. तसेच, मी व माझे संचालक मंडळ बाजार आवारात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यांसाठी प्रयत्न करीत आहोत. तसेच, शुभेच्छा प्रसंगी मी व्यापारी व अडत्ये,हमाल,मापारी यांना सुध्दा आव्हान करतो की, बाजार आवारात विक्री करिता आलेल्या शेतमालाचे तात्काळ लिलाव,वजनमाप,व शेतमालाचा चुकारा तात्काळ अदा करून समितीला सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments