Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा जीव गेला, पत्रकार परिषदेत नातेवाईकांचा आरोप

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा जीव गेला, पत्रकार परिषदेत नातेवाईकांचा आरोप

मूल प्रतिनिधी

मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाचा डॉक्टरांच्या हलगर्जी व बेजबाबदारपणामुळे जीव गेला असुन डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसा आरोप नातेवाईकांनी प्रेस क्लब मूल पत्रकार परिषदेत केला.

मूल शहरातील इंदिरानगर वार्ड नंबर 11 येथील सुमित सुभाष गेडाम याला तबेत बरी नसल्याने 10 आगस्त ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी 11 तारखेला दुपार च्या दरम्यान सुमितची प्रकृती चिंताजनक झाली. तेव्हा कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकाना सुमितच्या आईने माहिती देऊन लगेच डॉक्टरांना बोलविण्याची विनंती केली. मात्र परिचारिकेने रुग्णाच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलून हाकलून दिले. त्यानंतर रुग्णाची आई डॉक्टरकडे गेले. संबंधित डॉक्टरांनी सिरीयस पेशंट तपासायचे असून आता मला वेळ नाही, थोड्यावेळात येतो असे म्हणून सांगितले. त्यानंतर नातेवाईक डेविड खोब्रागडे हे दवाखान्यात आले असता त्यांनी सुद्धा डॉक्टरांकडे रुग्णांची परिस्थिती सांगितली. आणि उपचार करण्याची विनंती केली. तरी सुद्धा डॉक्टरांनी दुर्लक्ष करत उपचार केले नाही. 

त्यानंतर तब्बल तीन ते चार तासांनी परिचारक यांनी रुग्णावर कुठलाही उपचार न करता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे तात्काळ घेऊन जाण्यास सांगितले.  रुग्णाला चंद्रपूर येथे नेले असता चंद्रपूरच्या डॉक्टरांनी रुग्णाला मृतक घोषित केले.

मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी हे रुग्णांकडे लक्ष न देता रुग्णांच्या नातेवाईकांसोबत उद्धटपणे बोलतात. अशा डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मूल पोलीस स्टेशन येथे तक्रारीत मृतकाच्या आईने व नातेवाईकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments