Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दिपाली कन्नाके ची नेट परीक्षेत सुयश

दिपाली कन्नाके ची नेट परीक्षेत सुयश 

मूल प्रतिनिधी

सहाय्यक प्राध्यपक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) दिपाली या कन्नाके यांनी मराठी विषयातून द्वितीय प्रयत्नामध्ये गुणवत्तेमध्ये येऊन उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी  मराठी व समाजशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सध्या त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंधळी ता.कुरखेडा जि. गडचिरोली येथे कार्यरत आहेत.

नेट सारख्या अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत त्यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.  त्यांनी अभ्यासात मेहनत, नियोजन व सातत्य ठेवल्यास यश मिळते हे त्यांनी नेट / सेट चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दाखवून दिले आहे. या यशाचे श्रेय आपले आई - वडील , भाऊ, बहीण व पती (लिकेश कोडापे गडचिरोली) यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments