Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणा-या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा -अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेची मागणी

वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणा-या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा -अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेची मागणी  

मूल प्रतिनिधी
संभाजी भिडे यांच्या कडून वारंवार महापुरूषांच्या बाबत वारंवार वादग्रस्त व बेताल वक्तव्य करण्यात येत आहे. ज्यांनी शिक्षणांची दारे सर्वांसाठी उघडे केले असे सामाजीक क्र्रांतीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व कंा्रतीज्योती सावीत्रीआई फुले तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे वारंवार महापुरूषांचा अपमान करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भिडे कडून केल्या जात आहे. 
 बहूजन  महापुरूषांच्या नावाने युवकांची मती भडकवून आमच्याच लोकांना एकमेेकाच्या जाती विरोधात उभे करणे आणि त्यांच्या मध्ये दंगाली घडवून आणण्याचा प्रयत्न भिंडेचा असतो. बहूजन प्रतीपालक छत्रपती शिवाजी महाराज संघटना स्थापन करून बहूजन युवकाना छत्रपतीच्या ख-या विचारांच्या विरोधात तयार करण्योच षडयंत्र मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे करीत आहेत.
  ज्या महापुरूषांनी स्वतंत्र,समता न्याय बंधूता प्रस्तापित करण्यासाठी व या देशातील लोकांन मध्ये प्रेम आणि सहिष्णूता प्रस्तापित करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्ष घालविले अशा महापुरूषांनविषयी वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणा-या संभाजी भिडे यांच्या विरोध अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकत्यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा महात्मा फुले चैकात निषेध करून त्यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून त्यांना  दिलेली सुरक्षा तात्काळ काढावी व अटक करावी अशी मागणी करण्यात आली.
  समता परीषदेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रा.विजय लोनबले, जिल्हामहिला कार्याअध्यक्षा सौ.शशीकला गावतुरे ,समता परिषदेचे जिल्हासल्लागार माजी जिल्हा परीषद सदस्य प्रा.रामभाऊ महाडोरे,भूमीपुत्र ब्रिगडचे डाॅ.राकेश गावतूरे ,माजी नगराध्यक्ष वासूदेवराव लोनबले, डाॅ.पदमाकर लेनगुरे, वंचीत बहूजन आघाडीचे डेव्हीड खोब्रागडे , समता परीषदेचे जिल्हा सह सचिव ईश्वर लोनबले, शहरअध्यक्ष राकेश मोहूर्ले,जिल्हा कार्याकारनी सदस्य कैलास चलाख, संदिप मोरे, प्रशांत भरतकर, ओमदेव मोहूर्ले,प्रा.गुलाब मोरे, डाॅ.समिर कदम प्रा.वंसत ताजणे ,प्रा.प्रभाकर धोटे, प्रा.राजेष्वर राजूरकर, प्रा. डाॅ. केवल कराडे. देवराव ढवस, दलित जनबंधू, मनोज मोहूर्ले,रामदास जी गुरूनुले प्रा.पुरूषोत्तम कुनघाडकर, दुषांत महाडोरे,रोहीत निकुरे, दिपक महाडेारे,नितेश म्याॅकलवार,  परशुराम शेेंन्डे, संदीप मोहूर्ले, प्रतिक गुरूनुले, ईश्वर निकुरे,श्रीकांत मुरमुरवार, राहूल गुरूनुले, श्रींकात शेंन्डे,शुभम शेंन्डे, श्रीकृष्ण गुरूनुले, गणेश मोहूर्ले, रोहीदास वाढई, श्रीकांत हस्ते, समता परिषदेच्या महीला सदस्य सौ.सिमा विजय लोनबले, सुवेद लोनबले ,प्रविण भरतकर ,मनोज कावळे, शूभम शेंन्डे व शेकडो समता सैनिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments