Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चला झाडे लाऊया, माझी जबाबदारी माझे कर्तव्य! Let's plant trees, my responsibility my duty

चला झाडे लाऊया, माझी जबाबदारी माझे कर्तव्य!

मूल (प्रा.सुधीर नागोसे)

मूल शहर स्वच्छ आणि निरोगी असावे.असे प्रशासनाला आणि सर्वसामान्य जनतेला वाटते. मागील १० /१५ वर्षाचा कालखंड लक्षात घेता माणसाच्या व समाजाच्या विचारात व आचरणात आमुलाग्र बदल झालेला आहे .

कुटुंब संख्या आणि लोक संख्या वाढते आहे ती वाढतच राहणार आहे. त्यानुसार प्रशासनाने अनेक बदल केलेले आहेत. परिणाम असा झाला की , नागरी वस्त्यांची सुधारणा करताना अनेक दोष निर्माण झाले आहेत. काही सुधारणा करतांना निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन केल्या गेल्या. परिणामतः मूल शहर वासियांना त्याचे भोग भोगावे लागत आहेत .

आज मूल शहर अतिशय वेगाने तापत आहे . नविन रस्ते ,त्यांचे सिमेंटीकरण.,झाल्यामुळे उन्हाळ्यात ऊन जशी वाढायला लागते तसे तापमान देखील खूप वाढते .आज आपण ४३℃/४४℃ च्या तापमानात अंगाची काहिली करून जगत आहोत .दि .०८ जून २०२३ पर्यंत मूल शहराचे तापमान ४७℃ पर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे . शहराचे तापमान कमी ठेवण्याचा एकमेव उपाय म्हणजे शहरात विविध ठिकाणी व शक्य त्या ठिकाणी झाडे लावल्या गेली पाहिजे . किमान माझ्या शहराचे तापमान कमी करण्यासाठी आम्ही प्रशासनाला मदत केली पाहिजे . ही माझी जबाबदारी आहे . हे लक्षात घेऊनच झाडे लावण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे .

मूल परिक्षेत्रातील प्रशासन की , जे ,नगर परिषद , वन विभाग , बांधकाम विभाग तालुका क्रुषी , सिंचाई विभाग आणि असेच संलग्नित कार्यालये झाडे लावण्यासाठी योजनांची माहिती देताच आपण सहकार्य करूया . अशी मानसिकता आत्तापासून तयार करणे ही माझी जबाबदारी .!! माझे कर्तव्य!

Post a Comment

0 Comments