Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शासन आपल्या दारी अंतर्गत महाशिबिर, नागरिकांनी घेतला लाभ General camp under the government's door, citizens took benefit

शासन आपल्या दारी अंतर्गत महाशिबिर, नागरिकांनी घेतला लाभ General camp under the government's door, citizens took benefit


मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील उसराळा गावामध्ये तहसील कार्यालया तर्फे शासन आपल्या दारी अंतर्गत महाशिबिर हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना समजावून सांगितली. यामध्ये शेतीचे वाटणी पत्र, वारस हक्क चढवणे फेरफार, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला इत्यादी योजनेचे लाभार्थ्यांकडून स्वीकारण्यात आले. यावेळी तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी,मंडळ अधिकारी , तलाठी , सरपंच – प्रियंका लोकनाथ नर्मलावार,पुप्पाताई हिराजी मशाखेत्री,पोलीस पाटील,महेश पेंन्दोर तलाठी, किरणदास कोरडेसदस्य कर्णविर राउुत सदस्य आदी उपस्थित होते.त्यातच रखरखत्या उन्हात ओसांडून वाहणारा नागरिकांचा उत्साह दिसत होता.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मौजा उश्राळा(ता. मूल ) येथील  बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याचे यासाठी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी  गावात दाखल झाले. यावेळी  तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी, गावचे सरपंच सरपंच – प्रियंका लोकनाथ नर्मलावार यांच्या उपस्थितीत येथील बांधवाना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

यावेळी तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी म्हणाले की ‘शासन आपल्या दारी’ हा राज्य शासनाने सुरू केलेला एक महत्त्वकांक्षी उपक्रम आहे. लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या हक्काचे लाभ त्यांना देणे तसेच वेगवेगळ्या विभागाने एकत्र येऊन एकाच छताखाली नागरिकांपर्यंत योजना पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शासन फक्त मदत करू शकते, मात्र स्वतःच्या परिवर्तनासाठी व गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे.

प्रत्येक योजनांची गोरगरीब जनतेला माहिती व्हावी या उद्देशाने उश्राळा येथे येथे शासन आपल्या दारी या योजनेंतर्गत महसूल विभागाच्या वतीने महाशिबिर पार पडले. मारोडा तलाठी साजा अंतर्गत उश्राळा येथे येथे शासन आपल्या दारी या योजनेंतर्गत महसूल विभाग तहसील कार्यालय मूल च्यावतीने वतीने हे महाशिबिर घेण्यात आले. या शिबिरात महसूल विभाग,  ग्रामपंचायत उश्राळा व या सर्वांनी आपले स्टॉल लावून आपापल्या शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना समजावून सांगितली.

यामध्ये शेतीचे वाटणी पत्र, वारस हक्क चढवणे, फेरफार, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले इत्यादी योजनेचे अर्ज लाभार्थ्याकडून स्वीकारण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी , तलाठी अनेक नागरीक आदी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments