Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पोलीस बंदोबस्तात उचलले प्रेत, नातेवाईकातच होता रस्त्याचा वाद The dead body was picked up by the police, there was a road dispute between the relatives

पोलीस बंदोबस्तात उचलले प्रेत, नातेवाईकातच होता रस्त्याचा वाद

मूल प्रतिनिधी


रस्त्याचा वाद असल्याने दोन दिवसापासून मृत्यु पावलेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकच रस्ता खुला करून न दिल्याने प्रशासनात खळबळ माजली. नगर परिषद मूल येथील वार्ड न.१६ मधील वनिता नारायण खोब्रागडे (४५) या मृतक महिलेचे प्रेत अखेर पोलिस बंदोबस्तात प्रेत उचलण्यात आले.नातेवाईकच रस्ता देत नसल्याने संपुर्ण समाज पेटुन उठल्याचे दिसुन आले.

मूल येथील  विहीरगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व बौद्ध समाज असलेल्या या वार्डात वनिता नारायण खोब्रागडे (४५) ही महिला दोन दिवसापासून मृत्यु पावली होती. घरी कुणीही नसल्याने ही बाब निदर्शनास आली नाही. दोन दिवसांनी दुर्गंधी पसरु लागल्याने चर्चा सुरू झाली.नातेवाईकांना या विषयी कळविण्यात आले. अंत्यसस्कराची तयारी करीत असताना माञ नातेवाईक असलेल्या अनुसया पत्रुजी खोब्रागडे व इतर नातेवाईकांनी प्रेत जाऊ न देण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी नगर परीषद प्रशासन व तहसील प्रशासन येवुन समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही प्रतिसाद दिला नाही. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश बनसोड यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाच्या मदतीने प्रेताला रस्ता मोकळा करून दिला. सकाळपासून प्रेताचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न अखेर पोलिस बंदोबस्तात पार पडल्याने वार्ड वासियांना दिलासा मिळाला.

Post a Comment

0 Comments