Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वादळ वाऱ्याने छोटे दुकान व घरांचे नुकसान, प्रशासनाने मदत जाहिर करण्याची मागणी Damage to small shops and houses due to the storm, demand from the administration to announce help

वादळ वाऱ्याने छोटे दुकान व घरांचे नुकसान, प्रशासनाने मदत जाहिर करण्याची मागणी

मूल प्रतिनिधी


शनिवारला दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन चक्रीवादळासारखे वादळ बेंबाळ या गावात धडकले व अर्धा तास वादळ वाऱ्यासह पावसामुळे गावातील शेकडो घरांचे आतोनात नुकसान केले. मोठे मोठे झाडे घरावर पडल्याने घरांची प्रचंड नुकसान झाली तर लहान लहान दुकाने चक्रीवादळात उडून गेल्याने छोट्या दुकानदाराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

गावातील नागरिकांच्या घरातील इतर मालमत्तासह अन्नधान्याची मोठी नुकसान झाली आहे. रस्त्यावरील शेकडो विद्युत खांब तुटले तर काही पूर्णपणे वाकून गेले आहेत. घरावरील छत उघडल्यामुळे व घरातील संपूर्ण वस्तू अस्ताव्यस्त झाल्यामुळे नागरिकांना राहण्यासाठी अडचण होत असून मोठा आर्थिक फटका नुकसानग्रस्त कुटुंबाला बसला आहे.

शासनाने प्रशासकीय स्तरावरून तात्काळ पंचनामे करून नागरिकांना आपत्कालीन निधीची तात्काळ तरतूद करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसचे युवा नेते प्रशांत उराडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक वाढई, सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार,दिपक कोटगले, विनोद वाढई तथा काँग्रेसच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली.

Post a Comment

0 Comments