Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे योग दिन साजरा

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे योग दिन साजरा

मूल प्रतिनिधी

मूल येथिल शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचलित बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे आज दिनांक 21 जून 2023 रोज बुधवार ला आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयात योग दिन  मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री विनोद सर यांनी योग नृत्य परिवार शाखा मुल चे प्रशिक्षक श्री विष्णू सादमवार, सौं शामला बेलसरे, सौं वैशाली काळे, सौं कल्पना मस्के, सौं करुणा रस्से, सौं सविता मारटकर सौं राधिका बुक्कावार या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन योग दिनानिमित्य शुभेच्छा दिल्या तसेच शाळेतील शिक्षक,  शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट सहभाग दर्शविला व शाळेचे प्राचार्य विनोद सर यांनी जीवनामध्ये योगाचे काय महत्व आहे हे पटवून देत 'करो योग रहो निरोग' हा नारा देत विद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments