Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पहिल्यांदाच मूल शहरात बहुचर्चित नाटक - मुंबई कोणाची? आणि लोकरंग या दोन प्रयोगांचे आयोजन Whose drama is Mumbai?

पहिल्यांदाच मूल शहरात बहुचर्चित नाटक - मुंबई कोणाची? आणि लोकरंग या दोन प्रयोगांचे आयोजन

मूल प्रतिनिधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित बहुचर्चित नाटकाची इप्टा मुंबई या संस्थेने निर्मिती केलेली असून या नाटकाचे दिग्दर्शन एन एस डी चे सुप्रसिद्ध दिग्दर्शक शिवदास घोडके यांनी केलेले आहे तर या नाटकाचे संगीत धम्म मुक्तीवादी यांचे आहे. या नाटकाचे आजपर्यंत राज्यभरात तसेच देशभरात असंख्य प्रयोग सादर झाले. नाटक समाज प्रबोधनावर आधारित असून विनोदी आशयाचे असल्याने नाट्यरसिकांना प्रभावी वाटते. याच नाटकाचा एक प्रयोग आयोजिका प्राची गोंगले यांच्या प्राची इवेंन्टस् च्या माध्यमातून येत्या बुधवारी दि. ७ जून रोजी सायंकाळी ९ वा. मुल मधील नाट्यप्रेमीं करिता विशेष प्रयोग मा. सा. कन्नमवार या नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेला आहे. या नाटकातील कलाकार सध्या अनेक मनोरंजन वाहिन्यांवरील मालिका तसेच नवनविन मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या घरा घरात पोहोचलेले आहेत, याच कलाकारांचा अभिनय प्रत्यक्ष बघण्याचा त्यांना भेटण्याचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. या लोकप्रिय नाटकात कलाकार - सिध्दार्थ प्रतिभावंत, दिपाली बडेकर, मनोज चिताडे, निखिल राठोड, संबुध्द, सुशांत पवार, डॉ. शेषपाल गणवीर, रेणुका धावळे, आकाश खळे, सुमित त्रिपाठी, मयुर जाधव, पृथ्वी केसरी, युवराज, नारायण सोनकांबळे यांच्या भुमिका बघता येणार आहेत.

त्याच बरोबर मुल मधील रहिवासी आणि लोककलेची विद्यार्थीनी प्राची गोंगले यांच्या संकल्पनेतून पारंपारिक लोककला - गण, गवळण, बतावणी, लावणी या प्रयोगाचे देखील आयोजन या वेळी करण्यात आलेले आहे. या प्रयोगातील कलावंतांनी अनेक पुरस्कार प्राप्त करत आपल्या राज्याचे आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे प्रतिनिधित्व केलेले आहे. यातील कलाकार आज ही प्रेक्षकांना मालिका चित्रपटातून भेटत असतात. या हि लोकप्रिय कलाकारांची कला बघण्याची संधी याच वेळी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या प्रयोगात कलाकार - दर्शन गुजराती, विशाल कुमार, कैवल्य रायकर, कैलास सुरवसे, वृषभ मांडवे, स्वप्निल साळवी, सहज सोलकर, प्राची मोहिते, अनुष्का मंडलिक, पुर्वा पोतदार, स्वरांगी पाटील, पद्मजा ढवळे, धनश्री जोशी हे आपली कला सादर करणार आहे. या संपूर्ण टीमला प्रा. डॉ. गणेश चंदनशिव यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

अशा आगळ्या वेगळ्या बहुचर्चित नाटकाचा आणि लोकरंग प्रयोगाचा आस्वाद मुल मधील तसेच आजुबाजूच्या सर्वच रसिकप्रेक्षकांना एका तिकिटात घेता येणार आहे. सदरील प्रयोगांची तिकिट विक्री मुल मधील - श्री. साई ग्राफिक्स, बस स्टॅण्ड समोर, राकेश ठाकरे गुरुकृपा प्रोव्हिजन चंद्रपूर रोड, स्व. मा. सा. कन्नमवार नाट्यगृह येथे सुरु आहे. या दर्जेदार प्रयोगांचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घेण्याचे आवाहन आयोजक प्राची गोंगले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments