Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

गट शिक्षणाधिकारी खांडरे यांचा समारोप, नवे गट शिक्षणाधिकारी वर्षा पिपरे यांचा स्वागत सोहळा संपन्न

गट शिक्षणाधिकारी खांडरे यांचा समारोप, नवे गट शिक्षणाधिकारी वर्षा पिपरे यांचा स्वागत सोहळा संपन्न 

मूल प्रतिनिधी
 
आज दिनांक 27/06/2023 रोज मंगळवारला पंचायत समिती येथील सभागृहामधे प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती तर्फे सन्मा. वैभव खांडरे साहेब  गटशिक्षणाधिकारी यांची मुल येथून बदली झाल्यामुळे त्यांचा समारोपीय सत्कार करण्यात आला . त्याचप्रमाणे सन्मा. वर्षाताई पिपरे मॅडम यांनी नुकताच गटशिक्षणाधिकारी यांचा पदभार स्वीकारला त्यामुळे त्यांचा स्वागत सोहळा साजरा करण्यात आला . यावेळी मान . जयश्री गुज्जनवार मॅडम शि वी अ मुल, मान . गजेंद्र कोपूलवार सर केंद्र प्रमुख भेजगाव, मान . कोरडे सर केंद्रप्रमुख मारोडा, यांच्या प्रमुख उपस्थितीत व समन्वयक मान . नंदकिशोर शेरकी सर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान . सुनिल निमगडे सर यांनी केले . कार्यक्रमा प्रसंगी मान . सुंदर मंगर सर , मान . जगदीप दुधे सर, मान . लक्ष्मण सोयाम सर, मान . अल्काताई रेवतकर मॅडम, मान .रत्नमाला गेडाम मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले . सन्मा. वर्षाताई पिपरे मॅडम यांनी स्वागतपर भाषणात शिक्षकांना योग्य प्रकारे सहकार्य करेन व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेन त्याचप्रमाणे शिक्षकांनीसुद्धा गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करावे असे सांगितले . सन्मा. वैभव खांडरे साहेब यांनी आपल्या कार्यकाळातील शिक्षकांच्या समस्या व आपल्या प्रशासनातील अनुभव विषद केले . व कार्य पार पाडीत असतांना शिक्षक संघटना व सर्व शिक्षकांनी चांगले सहकार्य केले . असे मत व्यक्त केले .
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान . लक्ष्मण खोब्रागडे सर यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मान . अतुल तिवाडे सर, मान . कविराज मानकर सर, अशोक पाऊलकर सर, सुखदेव मांदाडे सर, मा . कोलबोकवार सर, क्रिष्णा बावणे सर, छबन कन्नाके सर, गोविंदा सोनटक्के सर, विद्या देवगडे मॅडम , मनोज बंडावार सर, त्याच प्रमाणे पंचायत समिती मुलचे सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी प्रयल केले .  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सन्मा. रत्नमालाताई गेडाम यांनी केले . समारोप व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला .

Post a Comment

0 Comments