Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्यारे फाऊंडेशन, मूल पोलिस आणि युवकांनी वाचविले तीन गायींचे प्राण तस्करीच्या वाहनातून जनावरे पडल्याचा संशय

प्यारे फाऊंडेशन, मूल पोलिस आणि युवकांनी वाचविले तीन गायींचे प्राण
तस्करीच्या वाहनातून जनावरे पडल्याचा संशय

मूल (अमित राऊत )

चंद्रपूर येथील प्यारे फाऊंडेशन, मूल पोलिस आणि युवकांनी तीन गायींचे प्राण वाचविल्याची घटना रविवारी सकाळी घडली.ही जनावरे तस्करीच्या वाहनातून पडली असावीत असा संशय व्यक्त होत आहे. पाच तासांपेक्षा अधिक काळ ही जनावरे मूल ते जानाळा मार्गावर पडून विव्हळत होती. मूल येथील सकाळी फिरायला जाणा-या काही युवकांच्या समयसुचकतेमुळे ही घटना उघडकीस आली. गंभीर जखमी झालेल्या एका गर्भवती गायीसह इतर दोन जनावरांना वाचविण्यात मोठे यश मिळाले आहे. यानिमित्ताने   माणुसकीचा झरा दिसून आला आहे. तसेच प्राणी मात्रांवर दया करा हे प्रत्यक्षात कृती तून सिदध झाले आहे. याचा प्रत्यय मूलच्या युवकांनी दिला. तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात असल्यातरी  रात्री बेरात्री अजूनही गोवंशीय जनावरांची तस्करी केली जात असल्याचे यानिमित्ताने सिदध झाले आहे.

शनिवारच्या रात्री तस्करी करणा-या वाहनातून दोन गायी आणि एक भाकड गाय ही  जनावरे मूल चंद्रपूर मार्गावर पडली. मुलचे काही  युवक डोणी फाट्याच्या समोर सकाळी  सात वाजताच्या दरम्यान फिरायला गेले असता पुलाच्या खाली गंभिर जखमी अवस्थेत गाय आणि भाकड गाय थोड्या थोड्या अंतरावर पडलेली दिसले.

ही गंभीर अवस्था बघून युवकांचे हृदय हेलावले. आणि त्या जखमी जनावरांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. युवकांनी चंद्रपूर येथील प्यारे फाउंडेशन आणि मूल पोलीस स्टेशनला माहिती दिली. लगेचच प्यारे फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि मूल पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले.

विशेष म्हणजे या घटनेत गंभीर आणि गर्भवती गाय असल्याचे बघून बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला वेदना होत होत्या.

परिस्थिती बघून मूलच्या त्या युवकांनी प्यारे फाउंडेशन आणि मूल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पुलाखाली पडलेल्या भाकड आणि जखमी गर्भवती गाईला वाहनाने सुखरूप चंद्रपूरला उपचाराकरिता रवाना केले. 

विशेष म्हणजे मूलच्या युवकांनी तत्परता दाखवत माणुसकी अजूनही शिल्लक असल्याचे दर्शन घडवून आणले. त्या युवकांचे प्राणिप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले आहे. 
’संबंधित घटना पोलीस आणि प्राणी मित्रांच्या निदर्शनास आणून गाईंना इस्पितळात पाठविणारे’ मयूर कामडे, मूल ,अभिषेक तुडूंरवार मूल,रोशन मेडपल्लीवर मूल यांचे विशेष कौतूक होत आहे. घटनास्थळ गाठून येथील पोलीस उपनिरिक्षक राठोड,पोलिस कर्मचारी राजेश शेंडे,तुकाराम सोनूले यांनी तात्काळ मदत केली.
’’गाईंवर प्रथमोपचार करून त्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यासाठी प्यारे फाऊंडेशनचे ’यश शर्मा प्यारे रेस्क्यू शेल्टर चंद्रपूर आणि  शशिकांत बीरे प्यारे रेस्क्यू शेल्टर चंद्रपूर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments