Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या वेबसाईटवर बंदी घाला - समता परिषदेची मागणी

क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या वेबसाईटवर बंदी घाला - समता परिषदेची मागणी

मूल प्रतिनिधी

क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिक टेल्स, आणि हिंदू पोस्ट, वेबसाईटवर बंदी आणुन लेखकांवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा अ. भा. महात्मा फुले समता परिषद जिल्हा चंद्रपूर च्या वतीने देण्यात आला.

इंडिक टेल्स, आणि हिंदू पोस्ट, नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जावुन लिखाण करण्यात आलेला आहे. शरयु ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. सावित्रीआई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय, अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे. सावित्रीआई फुलेंच्या कामाबद्दल इंडिक टेल्स, च्या लेखात अतिशय अपमानजनक आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. शिव-फुले-शाहू, सावित्रीआईची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून, त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.
क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे.
एकविसाव्या शतकात सुध्दा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनमांडणी या नावाखाली अक्षरश: इतिहासाची मोडतोड सुरु आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.

तरी, सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बातचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी.

अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी म. फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. विजय लोनबले, महिला जिल्हा कार्याध्यक्षा सौ. शशिकला गावतुरे, माजी जि.प.सदस्य प्रा. रामभाऊ महाडोरे, समता परिषेदेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री. युवराज चावरे, डॉ. पद्माकर लेनगूरे, माजी नगराध्यक्ष श्री. वासुदेवराव लोनबले, श्री. नामदेवराव गावतुरे, श्री. अनिलभाऊ सोनुले सरपंच, श्री. सुनिल काळे, डॉ. गेडाम, प्रशांत उराडे, दिपक महाडोळे, विक्रांत मोहूर्ले, राकेश मोहूर्ले, प्रदिप वाढई, रोहित निकुरे, महेश जेंगठे, प्रा. बि.डी. ताडे, प्रा. चक्रधर घोंगडे, परशुराम शेन्डे, दुषांत महाडोळे, सौ. शारदा शेन्डे, सौ.सिमाताई लोनबले, सौ. संगिता ढोले, श्रीमती शालु गुरनूले, सौ. ओमलता लेनगूरे, धनराज मोहूर्ले, वासुदेव नागोशे, रुषीदेव नागोशे, स्वप्नील बुरांडे, तुषार लेनगरे, योगेश लेनगूरे, छगन लेनगूरे, महादेव वाढई, संजय मोहूर्ले, प्रविण लोनबले, उर्वशी सोनुले, मोनिका गावतुरे, अंजली चौधरी, प्रकाश लेनगुरे,दलित जनबंधू,अनिल वाढई प्रमोद मशाखेत्रीआस्था लेनगूरे, संदीप मोहूर्ले, तुषार लेनगरे, मुर्लीधर वाढई, सुवेद लोनबले तसेच समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments