Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कराटे अँड फिटनेस क्लब मूल चे चिमुकले खेळाडूही स्पर्धेत कुठे कमी नाही

कराटे अँड फिटनेस क्लब मूल चे चिमुकले खेळाडूही स्पर्धेत कुठे कमी नाही

मूल प्रतिनिधी

जुंसेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया (JSKAI) ची नागपूर विभागीय इंटर डोजो कराटे चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन शनिवार 10 जून रोजी डिस्ट्रिक्ट कराटे-डो असोसिएशन चंद्रपूर द्वारा फिट-टू-फाईट्स मार्शल आर्टस् अकॅडमी,चंद्रपूर मध्ये केले होते.या स्पर्धेमध्ये मूल मधून कराटे अँड फिटनेस क्लब च्या एकूण 27 कराटे खेळाडू सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून एकूण 20 सुवर्ण,13 रजत ,14 कांस्य पदक अशे एकूण 47 पदक मिळविले. ह्यांपैकी 7 खेळाडू हे फक्त 6 ते 9 वर्षाआतील असून त्यांनी 10 वर्ष आतील वयोगटात कुमिते आणि काता प्रकारात मध्ये आपल्या वय आणि वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले ह्या छोट्याखेळाडूंमध्ये दिग्वि गजेंद्र रायपुरे हिने अनुक्रमे रजत आणि सुवर्ण,वैष्णवी अनंत मानकर 1 सुवर्ण आणि 1 रजत, मेहेर विनोद कुकडे ने 1 रजत आणि 1 कांस्य, स्वराज वैंजनाथ पिसाळ ने 1 रजत आणि 1 कांस्य, विराज वैंजनाथ पिसाळ ने 1 कांस्य,परी नन्नावरे नी 2 कांस्य आणि सचित मांदाडे ने 1 कांस्य पदक जिंकले.  विजयी सर्व खेळांच्या सर्वत्र कौतुक करत अभिनंदन करण्यात येत आहे.ह्या छोट्या खेळाडूंना सराव करत 1-2 वर्षे झालेली आहेत.फार कमी वयात एखाद्या खेळात गोडी निर्माण करणं आणि खेळाचा सराव करणं आणि करवून घेणं हे भविष्यातील उत्कृष्ट  खेळाडूंची जागा निर्माण करण्याचा कार्य आहे.कराटे अँड फिटनेस क्लब प्रत्येक वयाचे प्रत्येक स्तरावरील खेळाडू घडविण्याच्या दिशेने कार्य करीत असल्याचे मत मुख्य प्रशिक्षक इम्रान खान आणि निलेश गेडाम यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments