Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वाहतूकोंडीत सापडलेल्या प्रवाशांना पाणी-बिस्कीट ची केली सोय, कार्यकर्त्यांचा पुढाकार Water and biscuits were provided to the passengers who were stuck in the traffic, the initiative of the activists

वाहतूकोंडीत सापडलेल्या प्रवाशांना पाणी-बिस्कीट ची केली सोय, कार्यकर्त्यांचा पुढाकार

मूल (अमित राऊत)
मूल रेल्वे स्टेशन पॉईंटवर मशिनरी घेऊन जाणारा ट्रक काही कारणास्तव अडकल्यामुळे सात ते आठ किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम झाली होती. या वाहतूक कोंडीत प्रवश्याना पाच ते सहा तास वाहनात बसून राहावे लागले. मुल वरून चंद्रपूर ला अर्जंट जाणाऱ्यांना आणि इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

सध्या उन्हाळा सुरु असल्याने क्षणा क्षणाला पाण्याची नितांत आवश्यकता भासते. या परिस्थितीत प्रवश्यांची अडचण बगता मूल येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लगेच पुढाकार घेत पाण्याची आणि बिस्कीट ची सोय उपलब्ध करून दिली.

ही सोय मूल चे सामाजिक कार्यकर्ते श्याम उराडे, साई गुंडोजवार, कुमार दुधे यांनी ही सोय केली. यावेळी फसलेला ट्रॅक काढण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते गुड्डू हेडाऊ, रोहित आडगुरवार, शिवम चिलके आणि आणखी काही मूल च्या नागरिकांनी मोठी मेहेनत घेतली.

Post a Comment

0 Comments