Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

स्त्री शक्ती समाधान शिबिर संपन्न, महिलांनी मांडली आपली समस्या Stree Shakti Samadhan Camp concluded, women presented their problems

स्त्री शक्ती समाधान शिबिर संपन्न, महिलांनी मांडली आपली समस्या

Stree Shakti Samadhan Camp concluded, women presented their problems

मूल प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समस्याग्रस्त, पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपिठ मिळावे व त्यांच्या हक्काचे संरक्षण होउन न्याय मिळावा, त्यांच्या अडचणीची शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी, समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्याचे दिशा निर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे मूल तालुक्यात तहसील कार्यालय मूलचे सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार मूल होते तर प्रमुख अतिथी म्हणून चनफने, सहाय्यक गटविकास अधिकारी, ओंकार ठाकरे नायब तहसीलदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.थेरे, चौधरी, कृषी अधिकारी पंचायत समिती ,टिपरे म्याडम, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मूल आदींची उपस्थिती होती.

विविध विभागांच्या स्टालला भेटी देत अतिथींनी सभागृहात प्रवेश केला, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली , स्वागत समारंभानंतर प्रास्ताविक निलेश चव्हाण बालविकास प्रकल्प अधिकारी मूल यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आपापल्या विभागांची माहिती देण्याचा प्रयत्न केला.

Post a Comment

0 Comments