Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वादळी पावसाने छप्परे उडाली, आर्थिक नुकसान, विज पुरवठा खंडीत Roofs blown off due to stormy rains, financial loss, power supply cut

वादळी पावसाने छप्परे उडाली, आर्थिक नुकसान, विज पुरवठा खंडीत

मूल (अमित राऊत)

काल अचानक सायंकाळपासून गार वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावली. यात मूल तालुक्यातील चक दुगाळा येथिल घनश्याम पत्रुजी वाळके यांच्या घराची छप्पर, गोठा आणि दुगाळा माल या गावातील बैलाच्या गोठ्यांची छपरे उडाली. यात घर मालकाचे , शेतकरी चे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घरांचे छपरे उडाल्याने घरमालक विवंचनेत पडला आहे. शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.

छप्परे उडाल्याने गोठ्यात असलेल्या बैलाचे जीव थोडक्यात बचावले. गोठ्यात असलेले लाईट व पंखा तुटून पडले. ही घटना काल रात्र आठ ते नऊच्या दरम्यान घडली.
काल अचानक सायंकाळी सात वाजता पासून वादळ वारा सुरू झाला आणि अचानक पाऊसही पडला. विजेचे खांब तुटून पडले आहेत, त्यामुळे कालपासून दुगाळा माल आणि चक दुगाळा या दोन्ही गावातील वीज खंडित झाली आहे. दोन्ही गावांना अंधारात रात्र काढावी लागली. वीज पुरवठा सुरू नसल्याने गाव वासीयांना आजही अंधारातच रात्र काढावी लागणार असल्याचे गावकऱ्यांनी मूल Live शी बोलताना सांगितले.

विज वितरण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करून गाव वासियांना अंधारातून मुक्त करावे अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments