Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरात डुकरांचा आणि कुत्र्यांचा हैदोस, नागरिक झाले बेजार, बंदोबस्त करण्याची मागणी #Pigs and dogs in Mool city, citizens are fed up, demand for settlement

मूल शहरात डुकरांचा आणि कुत्र्यांचा हैदोस, नागरिक झाले बेजार, बंदोबस्त करण्याची मागणी

मूल प्रतिनीधी

मूल शहरातील डुप्लेक्स कॉलनी ते आदिवासी मुलांचे वस्तीगुह तसेच चरखा संघ च्या आवारात डुकरांचा Pigs हैदोस वाढला आहे. मोठ्या प्रमाणात डुकरांच्या कडपाचा वावर वाढल्याने तेथील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे चरखा संघाला लागूनच उपजिल्हा रुग्णालय आहे. चरखा संघ आणि रुग्णालयाचा परिसर असल्याने तेथे स्वच्छता असणे आवश्यकच आहे. मात्र डुकरांच्या त्रासामुळे नागरिक बेजार झाले आहेत.त्यामुळे डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी तेथील नागरिकांनी वारंवार केली आहे. या समस्येकडे मूल नगर परिषदेने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

शहरातील विविध भागात, खुल्या जागेत कुत्र्यांचाही Dogs सुळसुळाट वाढला आहे. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे त्रास होत आहे. कुत्र्यांचा तिथे वावर असल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ले करीत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. विशेष म्हणजे सकाळच्या वेळेस भीतीचे वातावरण तयार झाले आहे. डुकरांच्या हैदोसा सोबतच कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. कुत्र्यांचा व डुकरांचा प्रश्न समस्या मूल शहराची या सामाजिक गृप वर मांडण्यात आली.

गावठी डुकरांमध्ये एक रानटी डुकराचा समावेश असल्याची माहिती आहे. ग्रुप अडमिन संतोष चिताडे यांनी समस्या सोडविण्याची मागणी केली. नागरीकांनी गृप वर समस्या मांडल्यावर पर्यावरण प्रेमी उमेशसिंह झिरे यांनी वनविभागाला माहिती देऊन रानटी डुकराचा बंदोबस्त करणार असल्याची माहिती दिली आहे. शहरातील डुक्कर आणि कुत्र्यांचा बंदोबस्त संबधीत विभागाने करावे, अशी मागणी तेथील नागरिकानी केली असल्याचे मूल Live शी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments