Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार Congratulations to the students

प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

मूल प्रतिनिधी
नव भारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात नुकत्याच जाहीर झालेल्या नागपूर विभागीय मंडळाचा निकाल जाहीर झाला. त्यात वर्ग १२ वी मध्ये प्रविण्या प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कू. पलक आनंदराव फलके ७८.५०% प्रथम, ku. सुजाता बंडू भडके ७५.५०% द्वितीय, श्रवण एस. तोटावार ७३.% तृतीय, या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून संस्थेच्या कार्यालयात संस्थाध्यक्ष ऍड. बाबासाहेब वासाडे, सचिव ऍड. अनिल वैरागडे, डॉ. राममोहन बोकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सदस्य के. जे. वासाडे, प्रणव वैरागडे, प्राचार्य अशोक झाडे, पर्यवेक्षक, मुंडरे सर, प्रा. कातकर हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांना, समाजातील शेवटच्या घटका ना कस करता येईल याचा विचार केला पाहिजे, पुढील उच्च शिक्षण घेताना कोणत्याही अडचणी आल्या त्यावर मात करीत आपल्या गुरुजनांचा आदर्श पुढे ठेवावा असे मत ऍड बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केले. व पुढील शिक्षणाकरिता शुभेच्छा दिल्या.

नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा निकाल 99.53% लागल्याबद्धल व्यवसाय अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल 100% , बिल्डिंग मेंन्टनन्स 93.75%, उत्तम निकालाची परंपरा कायम राखल्या बद्धल प्राचार्य अशोक झाडे, प्रा. महेश पानसे, प्रा. चंदन पुस्तोडे, प्रा. विजय कातकर, प्रा. सुनील कामडे, सौ.उगेमुगे मॅडम, प्रा. बोलीवार , प्रा. येलमुले,संजय येरोजवार सर, प्रभाकर धोटे सर, यांचेही अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments