Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन, महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावाCamp organized at Mul

मूल येथे स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन, महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा

मूल प्रतिनिधी
महिला व बाल विकास मंत्रालयाच्या शासन निर्णया प्रमाणे तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशा प्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमीत्याने सशक्त नारी – समृद्ध भारत या घोष वाक्याप्रमाणे स्त्रीशक्ती समाधान शिबिराचे आयोजन २२ मे रोज सोमवारला तहसील कार्यालय प्रशासकीय भवन उपविभागीय अधिकारी कार्यालय मूल येथील सभागृहात सकाळी११.०० वाजता करण्यात आले आहे.

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समस्याग्रस्त, पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपिठ मिळावे व त्यांच्या हक्काचे संरक्षण होउन न्याय मिळावा, त्यांच्या अडचणीची शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी, समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्याचे दिशा निर्देश देण्यात आले आहे.

त्याप्रमाणे मूल तालुक्यात तहसील कार्यालय (उपविभागीय अधिकारी कार्यालय) मूल सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरा मध्ये महिला-बालविकास, पंचायत समिती, महसुल विभाग, आरोग्यविभाग, शिक्षणविभाग, नगरपरीषद , कृषी विभाग , पोलिस विभाग इत्यादीसह अन्य शासकिय विभागाचे स्टॉल लागणार आहे.

यात महिला कडून त्यांच्या समस्या विषयी माहीती फार्म द्वारे घेऊन त्या सोडविण्या करीता संबधित विभागाचे प्रतिनिधी मार्गदर्शन करून समस्यांचे समाधान करणार आहेत. त्यामुळे या शिबिराचा लाभ तालुक्यातील महिलांनी घेऊन समस्यांचे समाधान करावे असे आवाहन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण बाल विकास प्रकल्प अधिकारी मूल यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments