Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

संतोष रावत गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी - सुमित समर्थ

संतोष रावत गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी - सुमित समर्थ 

मूल प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर काल रात्रौ अज्ञात इसमाने गोळीबार केला होता, या गोळीबार हल्ल्यात रावत थोडक्यात बचावले. ह्या घटनेचा निषेध करत अज्ञात आरोपीची सखोल चौकशी करून ह्यामागे असणारा खरा सुत्रधाराचा शोध घेऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी. शांत असलेल्या मूल तालुक्यात ह्यापुढे अशाप्रकारचे दुर्देवी घटना घडू नये.  सध्या ची परिस्थिती पाहता संतोष रावत ह्यांना पोलीस विभागा कडून विशेष सुरक्षा देण्यात यावी. अश्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सुमित समर्थ यांचे नेतृत्वात तहसील  कार्यालय मूल येथे देण्यात आले.

सदर निवेदन देतांना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष किसन वासाडे , शहर  कार्याध्यक्ष महेश जेंगठे , शहर सचिव दुशांत महाडोळे , तालुका युवक अध्यक्ष रोहिदास वाढई,  राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष प्रशांत भरतकर,  प्रभाकरजी धोटे सोशल मीडिया अध्यक्ष शुभम शेंडे, हेमंतजी सुपणार सर , सतीश गुरनुले ,योगेश आलाम , राजेश्वर मोहूर्ले,  बादल गुरनुले आदी बहुसंख्य पदाधिकारी निवेदन देण्याकरिता उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments