Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कार्यकर्तृत्वाने जनमानसात आदराचे स्थान मिळवलेले तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी


कार्यकर्तृत्वाने जनमानसात आदराचे स्थान मिळवलेले तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील महसुल अधिकारी व कर्मचारी बांधवात लोकप्रिय असणारे तदवतचं मुल तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांचा आज शनिवार दि. 06 मे ला वाढदिवस असुन त्यांना या दिवशी (सकाळ पासुनच) अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांना या दिनाचे औचित्य साधुन मुल तालुक्यात आपल्या कार्यकर्तृत्वाने जनमानसात आदराचे स्थान मिळवलेले तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांचा लेखाजोखा कौतुकास्पद आहे. मुल तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांच्या मनात त्यांच्याबाबत चांगल्या संवेदना आहेत.

आज तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळपासून त्यांना शुभेच्छा . नायब तहसीलदार मंडळ अधिकारी महसुल कर्मचारी आदिंनी शुभेच्छा प्रदान केल्या आहे.आपले सरकार , महाआॅनलाईन या व्हाॅटसअॅप गुप वरती विविध आॅपरेटर,संचालक,आधार संचालक,सुपरवायझर सेतू केंन्द्रातील आॅपेरटर सुटीचा दिवस असल्यामुळे व्हाॅटसअॅपच्या माध्यमातनू शुभेच्छा देण्यात आल्या.

लोकांच्या आशीर्वादामुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला असून लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून काम करतांना उतराई होण्यासाठी बांधील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.02 वर्षांपासून मुल तहसीलदार म्हणून काम पाहत आहेत. तेव्हापासून सामान्य शेतकऱ्यांसह शासनाच्या निर्देशानुसार त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. शांत, संयमी आणि अभ्यासूपणाने निर्णय घेतांना कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा त्यांनी नागरिकांसाठी काम करण्यासाठी उत्साह निर्माण केलेला आहे.

सामान्य माणसाला योग्य तो कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकांमध्ये निर्माण केलेले स्थान महत्वाचे ठरते. आज तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांचा वाढदिवस असल्याचे नागरीकांना माध्यमांतून समजल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

अचानक शुभेच्छांचा वर्षाव झाल्याने तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी गहिवरून गेले. पूर्वनियोजित नसतांना सर्वांनी व्यक्त केलेल्या आशिर्वादामुळे वाढदिवस अभूतपूर्व झाल्याचे त्यांनी सांगितले. शासनाची जबाबदारी पार पाडतांना लोकांनी व्यक्त केलेल्या भावनांमुळे काम करतांना लोकांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी बांधील असल्याचे ते शेवटी म्हणाले.

Post a Comment

0 Comments