Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बिस्किटे व फळ वाटप कार्यक्रम संपन्नBiscuits and fruit distribution program completed on the occasion of Adv. Balasaheb Ambedkar's birthday

ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बिस्किटे व फळ वाटप कार्यक्रम संपन्न

मूल प्रतिनिधी
 
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मुल येथे रुग्णांना बिस्किटे, फळ वाटून, केक कापून  शहर अध्यक्ष डेव्हिड खोब्रागडे यांचे अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा, शहर शाखा मुल चे वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

सुरुवातीला वंचित बहुजन आघाडी कार्यालय मुल येथे दिनांक १०/५/२०२३ ला सकाळी १0 वा. आदर्शच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वाढदिवसानिमित्त केक कापून साजरा करण्यात आला. रमेश मानकर केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण पूर्ण झाल्याबद्दल वंचित आघाडीतर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय मुल येथे रुग्णांना बिस्किटे फळ वाटप करण्यात आले. डॉ. लाडे व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांच्या हस्ते रुग्णांना फळ व बिस्किटे वाटप करण्यात आले. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस १० मे हा वंचित बहुजन समाजातर्फे स्वाभिमानी दिवस मानला जातो. या स्वाभिमानी दिवसाला वंचित बहुजन आघाडी तर्फे विविध उपक्रम राबवून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी उपस्थित उपजिल्हा रुग्णालय मुल येथील डॉ.लाडे, वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष डेव्हिड खोब्रागडे, शहर महासचिव दिलीप गेडाम, मुरलीधर घोणमोडे उपाध्यक्ष, पद्माकर नारनवरे माजी ताुकाध्यक्ष  जिल्हा प्रवक्त्या उषाताई दुर्गे, मनोहर दुर्गे शहर कोषाध्यक्ष, आद बबिता ताई भडके तालुका अध्यक्ष, मंदाताई गेडाम वॉर्ड अध्यक्ष, आद गोकुलदास बांबोळे शहर अध्यक्ष भा.बौ.म.स.मुल, केशव दुर्ग्रे  संघटक सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिलीप गेडाम  शहर महासचिव यांनी सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले. नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
       

Post a Comment

0 Comments