Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूलची महिला पत्रकार कुमदिनी भोयर ह्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा#Birthday Celebrate

मूलची महिला पत्रकार कुमदिनी भोयर ह्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मूल प्रतिनिधी

वाईस ऑफ डिजिटल मीडियाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्या, मूल तालुक्यातील पहिली महिला पत्रकार, उत्कृष्ट गायिका, श्री शक्ती ग्रुपच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या कुमारी कुमुदिनी भोयर यांचे वाढदिवसानिमित्त मूल Live कार्यालय तथा श्री साई ऑनलाईन झेरॉक्स सेंटर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कुमुदिनी भोयर हिने केक कापून सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वाढदिवसानिमित्त मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम, संघाचे उपाध्यक्ष तथा तरुण भारतचे प्रतिनिधी युवराज चावरे, संघाचे सचिव तथा विनायक रेकलवार, संघाचे सदस्य तथा डी.डी न्युज चे संपादक दिपक देशपांडे, वाईस ऑफ डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा पब्लिक पंचनामाचे संपादक विजय सिद्धावार, वाईस ऑफ डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष तथा मूल Live चे संपादक अमित राऊत, पी.एम.पोर्टलचे संपादक प्रमोद मशाखेत्री ,लोकमतचे ग्रामीण वार्ताहर शशिकांत गणवीर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितानी कुमुदिनी भोयर हिचे मनोबल वाढवत मूल तालुक्यात एकमेव महिला पत्रकार असल्याने मूल तालुक्याची शान आणि अभिमान असल्याचे यावेळी व्यक्त केले. तसेच पुढील वाटचाली करिता सर्वांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments