Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे आंबीलपोई व पाणपोई#Ambilpoi and Panpoi at Mul

मूल येथे आंबीलपोई व पाणपोई

मूल प्रतिनिधी

वातावरणातील गारवा कमी झाल्याने उन्हाच्या झळा पोहचत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तप्त उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना यातून दिलासा मिळावा म्हणून सामाजिक दायित्व जोपासत कार्यालयीन कामाकरीता येणाऱ्या नागरिकांना संविधान चौक येथे वासू डिजीटल आर्ट यांचे कडून आंबीलपोई तसेच श्री साई मित्रपरिवार यांचे वतीने पाणपोई सुरु करण्यात आली.

कार्यक्रमाचे उदघाटक सहायक पोलीस निरीक्षक सतीश बनसोड, प्रमुख अतिथी पोलीस उप निरीक्षक पुरुषोत्तम राठोड, नगर परिषदचे आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार यांची उपस्थिती होती.
यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधत संस्कृती साडी सेंटरचे संचालक माजी नगरसेवक प्रशांत लाडवे यांचे वतीने गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सचिन वाकडे, रवी बरडे, सागर बंडीवार, संदीप मोह्बे, विवेक मुत्यलवार, अनिकेत बुग्गावार, अमित राऊत यांनी परिश्रम घेतले. सदर उपक्रमाचे मुल शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments