Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अरूष प्रमोद गोंगले 96% गुण प्राप्त

अरूष प्रमोद गोंगले 96% गुण प्राप्त

मूल प्रतिनिधी
 

सीबीएसई चा  नुकताच 10 वीचा निकाल लागला. यात जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथील विद्यार्थी अरूश प्रमोद गोंगले याने 96 टक्के गुण मिळविले आहे. 

मूल शहरांतील ख्याती असलेले डॉ. प्रमोद गोंगले आणि डॉ. सौ. सुनिता गोंगले यांचा लहान मुलगा अरूश प्रमोद गोंगले हा इयत्ता 6 वी पासुन तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत होता. 

अरुष ने नुकतीच झालेल्या इयत्ता 10 वीच्या सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिला होता. त्याने 500 पैकी 480 गुण घेऊन 96 टक्के प्राप्त केले आहे. 

अरूश ने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथील प्राचार्य आणि सर्व शिक्षकांना दिले आहे.

अरूश चे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments