Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राजोली च्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या #Youth of Rajoli committed suicide by hanging

राजोली च्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मूल प्रतिनिधी

विवाहबाहय संबंधातून आलेल्या नैराश्यापोटी एका विवाहीत युवकाने गळफास घेवून जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील राजोली येथे घडली. विकास लाकडे (३८) असे मृतकाचे नांव असून मृत्युपूर्वी विकासने फेसबुकवर प्रेयसीच्या नांवाने पत्र प्रसारीत केल्याने त्या युवतीविषयी परिसरात चर्चा रंगू लागली आहे.
राजोली येथील वार्ड नं. ५ मधील रहिवासी विकास लाकडे (३८) पत्नी योगीता आणि ११ वर्षीय मूलगा व ९ वर्षाच्या मूलीसह राहत होता, देसाईगंज वडसा येथील एका नाटय मंडळात आँर्गन वाजविण्याचे काम करून मिळणा-या मोबदल्या शिवाय वाटणीला आलेली थोडी बहुत शेती करून मृतक विकास कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. दरम्यान कापड व्यवसाय करणा-या गावांतीलच एका विवाहीत युवतीशी त्याचे सुत जुळले. नाटय मंडळात आँर्गन वाजविण्याचे काम करतांना नाटकाचा प्रयोग आणि सरावाच्या निमित्याने मृतक विकास बहुतांशी वडसा देसाईगंज येथे राहत होता. दरम्यान कपडे विकण्याचा व्यवसाय करणारी ती युवती खरेदीच्या निमित्याने अनेकदा वडसा देसाईगंज येथे जात असायची. त्यामाध्यमातून मृतक विकासची त्या युवतीशी वारंवार भेटी होत होत्या. भेटीचे रूपांतर प्रेमात आणि त्यानंतर विवाहबाहय संबंधात झाले. दोघांच्याही गाठीभेटी वाढू लागल्यानंतर दोघांनीही एकत्रीत राहण्याचा निर्धार केला. पण कुटूंब आड येत असल्याने मृतक विकास सारखा विवंचनेत असायचा. दरम्यान दोघांच्याही विवाहबाहय संबंधाची चर्चा गावांत व कुटूंबात रंगू लागल्यामूळे मृतक विकासने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असावा. अशी चर्चा आहे. काल रात्रो ९.१५ वाजताचे दरम्यान स्वतःच्या फेसबुकवरून प्रेयसीच्या नांवाने पत्र प्रसारीत करून अप्रत्यक्षरित्या जीवन संपवित असल्याचे जाहीर केले. त्यामूळे मित्रपरिवारात खळबळ माजली. फेसबुकवरील पत्र वाचल्यानंतर अनेकांनी भ्रमणध्वनीवरून विकासशी संपर्क साधला. परंतू संपर्क होत नव्हता. म्हणून शेवटी मोबाईल मधील लोकेशनच्या आधारे शोध घेतला तेव्हा गावांपासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर असलेल्या गंगाधर लाकडे यांचे शेतातील झाडाला विकासने गळफास घेवून जीवन संपविल्याचे दिसून आले. लागलीच सदरची माहिती पोलीस पाटील यांचे माध्यमातून पोलीस स्टेशन मूल येथे देण्यात आली. घटनेची माहिती होताच ठाणेदार सुमीत परतेकी, स्थानिय गुन्हे शाखेचे पोउनि पुरूषोत्तम राठोड, पोउनि गेडाम यांनी सहका-यांसह घटनास्थळी भेट देवून घटनास्थळ पंचनामा करून मृतक विकासचे पार्थीव शवविच्छेदन करीता उपजिल्हा रूग्णालय मूल येथे पाठविण्यात आले. सदर घटनेवरून पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी राजेश शेंडे सहका-यासह करीत आहे.

Post a Comment

0 Comments