Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरात बेघर, बेवारस, निराधार, अनथांची तीन दिवस शोधमोहीम, दिव्य वंदना आधार फाउंडेशन चा उपक्रम #Support for the destitute

मूल शहरात बेघर, बेवारस, निराधार, अनथांची तीन दिवस शोधमोहीम, दिव्य वंदना आधार फाउंडेशन चा उपक्रम

मूल (अमित राऊत)

चंद्रपूर जिल्ह्यातील रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथांसाठी एकमेव दिव्यवंदना आधार फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहे. दिव्यवंदना आधार फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक बेघर,बेवारस,भिक्षेकरी ,निराधार,
लोकांना आधार दिला आहे. फक्त आधारच नाही तर दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारा लोकांच्या सेवेकरीता रुग्णवाईका उपलब्ध करून दिली आहे .शुभम पसारकर यांनी अनेक बेघर ,बेवारस लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. सोबतच त्यांना उद्योग उपलब्ध करून दिला आहे. चिमुर तालुक्यातील जामगाव येथे भव्य दिव्यवंदना आधार निवारागृह निर्माणकाम सुरू आहे.

मूल तालुक्यात तीन दिवसीय शोध मोहीम राबविण्यात येनार आहे. यामध्ये रोडवरील कचरा बेघर,बेवारस,निराधार,भिक्षेकरी आणि अनाथ यांचा शोध घेऊन त्याची आंघोळ करून दाढ़ी कटिंग करण्यात येनार आहे.  त्यांना समाजात जगण्याचा अधिकार दिला जानार आहे. नागरिकांच्या वापरण्यात न येणारे कपडे, चप्पल, जोडे आदी वस्तू या फाऊंडेशनला देण्याचे आवाहन केले आहे.

मूल शहरात तीन दिवस दिव्यवंदना फाउंडेशन ची संपूर्ण टीम व शहरातील नाग़रीक उपस्थित राहणार आहेत.  आपल्या परीसरात निराधार, अनाथ, भिक्षेकरी, बेवारस असे लोक आढळून आल्यास शुभम पसारकर 9561855778 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments