Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहराच्या समस्याकरिता बैठकीचे आयोजन, बैठकीला उपस्थित राहण्याचे ग्रुप ॲडमिन चे आवाहन. #Organizing meetings for parent city issues, inviting group admins to attend meetings

मूल शहराच्या समस्याकरिता बैठकीचे आयोजन, बैठकीला उपस्थित राहण्याचे ग्रुप ॲडमिन चे आवाहन

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील नागरिकांनी "समस्या मूल शहराच्या" हा व्हाट्सअप ग्रुप तयार करून अनेक नागरीकांना जोडले. यात मांडलेल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक महात्मा ज्योतिबा फुले मार्केट यार्ड वॉर्ड क्रमांक 08 , दुर्गा माता मंदिर परिसरात सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे.

शहरातील सर्वच वार्डात समस्या आजही कायम असल्याने या मध्ये शहरातील विविध नागरिकांनी आपापल्या समस्या मांडण्या सुरू केल्या.

कुठे आजही रोड, नाही तर कुठे नाली नाही, शहरात जागेच्या पट्ट्याचा प्रश्न तर कुठे घरकुलाचा प्रश्न, काही ठिकाणी रोड झाले तर गट्टू लावला गेले नाही. काही ठिकाणी खड्डे बुजविला गेले नाही. कुठे साचलेला पाणी असल्याने आरोग्याचा प्रश्न अशा विविध छोट्या-मोठ्या प्रश्नांना समस्यांना या ग्रुपमध्ये उधान आले.

त्यानंतर समस्या सोडवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली. आता मात्र या समस्याचे निराकरण करण्याकरिता बैठक घेण्याचे ठरविले. पुढे काय करायचे हे बैठकीत ठरविण्यात येणार आहे, त्याकरिता मूल शहरातील समस्या घेऊन या बैठकीला दुर्गा माता मंदिर, महात्मा फुले मार्केट यार्ड च्या मागे वार्ड नंबर 08 या ठिकाणी शनिवार दिनांक 22 एप्रिल 2023 ला सायंकाळी 6 वाजता बैठक घेण्याचे ठरविले आहे. सर्व सभासद व नागरिकांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रुप ॲडमिन आणि सदस्यानी केले आहे.

Post a Comment

0 Comments