Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बेंबाळ ग्रामपंचायतीच्या शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, सरपंच चांगदेव केमेकार यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य यांची प्रशासनाकडे मागणी #Obstruction in government work

बेंबाळ ग्रामपंचायतीच्या शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, सरपंच चांगदेव केमेकार यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य यांची प्रशासनाकडे मागणी

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यांतील ग्रामपंचायत बेंबाळ अंतर्गत जनधन योजनेद्वारा नाली बांधकाम व स्मशानभूमीचे शेड बांधण्याचे काम सुरू आहे. सदर बांधकाम सुरू झाल्यानंतर पराग वाढई रा.बेंबाळ हे ठेकेदाराला पैशासाठी वारंवार त्रास देतात. पराग वाढई हा स्वतःला बेंबळचा काँग्रेस शाखा अध्यक्ष समजतो व त्यामुळे मला २% कमिशन पाहिजे अन्यथा मी तुम्हाला काम करू देणार नाही. तसेच गावात जर काम करायचे असेल तर मला २% कमिशन दिल्याशिवाय मी कोणतेही काम होऊ देणार नाही असे बोलून कामावर असणाऱ्या मजुरांना काम करण्यापासून अडवितो व शिवीगाळ करतो तसेच तुमच्या कामाची वारंवार तक्रार करणार व तुम्हाला अजिबात काम करू देणार नाही अशी ठेकेदाराला वारंवार धमकी देत असतो.ही बाब अतिशय धोकादायक असून गावाच्या विकासात्मक कामात अडथळा आणून पैसे कमवण्यासाठी स्वतःची पोळी शेकण्याचे काम करताना दिसत आहेत. यामध्ये एका ग्रामपंचायत सदस्याचा सुद्धा हात आहे अशी माहिती सरपंचाना देण्यात आली. सदर ग्रामपंचायत सदस्याला उपसरपंच पद न दिल्यामुळे वारंवार ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना त्रास देऊन धारेवर धरण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न हा सदस्य करत आहे. ही बाब गावाच्या विकासात्मक बाबीला अडथळा असून भ्रष्टाचार मुक्त काम करणाऱ्या बेंबाळ ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे षडयंत्र करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीला घेऊन पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी मुल यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार, सदस्य विनोद वाढई तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील वाढई उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments